संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील कढोली गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते 41.17लक्ष रुपयाच्या निधीतून विकासकामाचे भूमीपूजन करण्यात आले.दरम्यान आमदार चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या अथक प्रयत्नामुळे कढोली गावाला 41.17लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सरपंच ब्रह्मण करारे यांनी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर तसेच माजी जी प सदस्य अनिल निधान यांचे ग्रा प चे समस्त सदस्य व गावकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
याप्रसंगी माजी जी प सदस्य अनिल निधान ,सरपंच ब्रह्मण करारे ,उपसरपंच महेश कुपाले,सचिव ब्रह्मानंद खडसे, गोविंदा ठाकरे, बबन वानखेडे, राकेश गावंडे, आरती घुले, इंदिरा रंगारी, संगीता चौधरी, मीनाक्षी ठाकरे, छाया ढोके आदी उपस्थित होते.