– आंतरराष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिव्हल नागपुरात
नागपूर :- IPAF, प्रस्तुत कार्यक्रमाचे सातवे वर्ष असून नागपुरात रविवारी 25 ऑगस्ट रोजी, सायंटिफिक हॉल लक्ष्मी नगर, आठ रस्ता चौक नागपूर येथे दुपारी 12 ते 3 या वेळेत सांस्कृतिक फेस्टिवल प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहेत.
जागतिक स्तरावरील संस्कृतींना एकत्र आणण्यासाठी काम केले जाते या उद्देशाने याप्रसंगी आसाम मधील प्रख्यात प्रेरोना भुयान यांची सत्तरिया डान्स, डॉ.अंजना झा, ग्वाल्हेर यांचे कथ्थक सादरीकरण केले जाईल तसेच मूकबधिर विद्यालय, हुडकेश्वर नागपूर यांचे विशेष प्रदर्शन आयोजित केले जातील. नंतर संस्कार कथ्थक केंद्र, नागपूर यांचे कथ्थक नृत्य नाटिका “कृष्णाई” परफॉर्मिंग आर्ट्स फेस्टिवल च्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे कळविले आहे.