भंडारा : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात साजरा करण्यात आला. संविधान दिनाच्या निमित्ताने उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
संविधान उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाला विशेष महत्व आहे. शासकीय सेवेत नोकरी करतांना उद्देशिका समोर ठेऊन कामे केली पाहिजे, असे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.