नागपूर :- महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा घेतला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. प्रधानमंत्री […]

नागपूर :-नागपूर महानगर पालिकेतील हंसा स्टारबस चे ड्रायव्हर हे मनपाच्या कोव्हीड सेंटरला कार्यरत असताना 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा मृत्यू झाला. वेळोवेळी निवेदने विनंती करूनही त्यांना पाच पैसे मिळाले नाही. नागपुरातील अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजने अंतर्गत कोव्हीड-2019 नुसार कर्तव्य बजावताना मृत झालेल्या त्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आज एका पत्र परिषदेद्वारे बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणची कार्यवाही.  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग कांद्री येथे फिरत्या गाडीवर खाद्य पदार्थ विक्री करताना दुकानदारास मारहाण करून लुटमार करणा-या टोळी तील मुख्य आरोपी चोरवा उर्फ ईरफान शेख यास स्था निक गुन्हे शाखेच्या पथकाने सिताफितीने पकडुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले. नागपुर ग्रामिण हद्दीत कांद्री कन्हान येथे […]

– घरकुलाचे काम 100 दिवसात पुर्ण करावे नागपूर :- अमृत महाआवास अभियानांतर्गत लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेले घरकुल 100 दिवसात पुर्ण करणे अपेक्षीत आहे. यादृष्टीने मंजूर घरकुलांचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांनी ग्रामपातळीवरील यंत्रणेला कामाला लावून ही कामे गुणवत्तापुर्ण व गतीने पुर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले. अमृत महाआवास अभियान 2022-23 च्या विभागीस्तरीय कार्यशाळेचे आयोजन आज […]

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्थितीत नागपूरला विविध लोकाभिमुख उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांनी घेतला लोकार्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुंबई :- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी दि. ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो […]

रेगडी येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन गडचिरोली :- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री,डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते रेगडी, ता.चामोर्शी येथील शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शाळेच्या मुलांच्या वसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी त्यांनी डीटीसी सह धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रत्येक आदिवासी समूहातील मुला मुलींना शालेय शिक्षण मिळालेच पाहिजे असे प्रतिपादन केले. दुर्गम भागात […]

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या 22 केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून शनिवार दिनांक 10 व सोमवार दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी महिला व बालविकास विभागाने […]

नागपूर:- केदारे मॅरेज ब्युरोतर्फे विदर्भ साहित्य संमेलन सभागृह मोर भवन येथे सर्व जाती पुनर्विवाह परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हलबा समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक गिरीधारी निमजे होते, तर विशेष अतिथी म्हणून सुरेश कुंभारे, अंबादास पराते, श्याम सोनकुसरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक भास्कर केदारे म्हणाले की, आज हलबा समाजाला फेकल्यासारखे वागवले जात आहे, जिथे आपली माणसे आपल्याच माणसांना घेऊन […]

मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील सर्वच महानगरपालिका सध्या फेरीवाल्यांना १० हजार रुपये कर्ज योजना देण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांना केंद्रशासनाने दिलेले टार्गेट सध्या सर्व महानगरपालिका पूर्ण करीत आहेत. फेरीवाल्यांना उपयुक्त असे व्यावसायिक कर्ज या योजनेमार्फत मिळत आहे. तसेच हे कर्ज केवळ १० हजारांचेच नसून ते पुढे २० ते ५० हजारांपर्यंत मिळणार आहे. कर्ज स्वरूपी योजनेचा फायदा घेताना फेरीवाल्याना प्रश्न पडलाय तो म्हणजे […]

नागपूर :- नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातील नुकत्याच झालेल्या 8 डिसेंबर रोजी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला, महाराजांजच्या जयंती निमित्त, अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर-वधू सुचक मंडळातर्फे आयोजित जयंती समारंभात तेली समाजाचे आराध्य दैवत व जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बारा टाळकऱ्यापैकी एक व तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांत आपल्या लेखणीने लिहुन काढणारे […]

पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना मंत्रालयात अभिवादन मुंबई :- देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी देखील दु:ख सहन करुन सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहतात. शिक्षक, शारीरिक प्रशिक्षण शिक्षक तसेच शिक्षण सेवक पदांची भरती करताना माजी सैनिक आणि वीरपत्नींचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. […]

मुंबई :- राज्यात एक लाख मराठा उद्योजक तयार होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे अशी माहिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी व या योजनांमधून मराठा उद्योजक […]

मुंबई :- देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर जी -20 परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे.जी 20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी […]

– 3 हजार 628 पदे निर्मितीला राज्य शासनाची मान्यता मुंबई :- तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. […]

नगपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवारी (8) रोजी शोध पथकाने 155 प्रकरणांची नोंद करून 86500 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

मुंबई :- हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा झाली आहे. जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार असून या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरु करण्यासाठी सर्व आवश्यक त्या सुविधा राज्य सरकारकडून पुरविल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात हायड्रोजनवर आधारित […]

कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहीजे – उदय सामंत मुंबई :- कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वराज्य भूमी कोकण’ महोत्सवास आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यावेळी […]

नागपूर :-  नागपूर शहरातील ऐतिहासिक नाग नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाने पुढे पाउल टाकत प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. या प्रकल्पाला केन्द्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी प्रदान केली आहे. नागपूर महानगरपालिका हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केला. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी केन्द्रीय मंत्रीमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेन्द्र […]

‘राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताहाला उत्स्फुर्त प्रतिसाद ४४०७ नागरिकांनी विविध कल्याणकारी योजनांच्या स्टॉलला भेट. नागपूर :-  ‘राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताहाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपुर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय दिव्यांग दिन’ सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा […]

-एमएलए कॅन्टिनचा लुक बदलणार -महिला आमदारांसाठी व्हीआयपी कक्ष नागपूर :-आमदार निवासात प्रवेश करताच एखाद्या पंचतारांकीत हॉटेलसारखा भास होतो. महानगरात किंवा विदेशातील हॉटलसारखी अंतर्गत सजावट, भिंतीवरील डिझाईन, लायटिंगचा इफेक्ट आणि भव्य दिव्य असे स्वरुप आमदार निवासाला देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केला. आकर्षक आणि देखण्या सजावटीने आमदार किंवा प्रशासकीय अधिकारीच काय सामान्य व्यक्तीही नक्कीच सुखावेल अशी कल्पकता वापरली आहे. हेच […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com