सिमेंट, विटा सवलती दरात दिल्यास १०० टक्के फ्लाय ॲशचा वापर शक्य  राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुषण चंद्रशेखर यांची मागणी नागपूर :-औष्णिक ऊर्जानिर्मितीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शेतीचे नुकसान, पाण्यावर होणारा परिणाम, राख पसरून स्थानिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न असे अनेक पैलू आहेत. या पार्श्वभूमीवर १०० टक्के राखेचा वापर होण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष व संचालक तसेच मुख्य […]

नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यानिमित्त संपूर्ण राज्यासाठी ‘समृद्धी’चा महामार्ग ठरणा-या मार्गाविषयी हा लेख … कुठल्याही देशाचा दर्जेदार विकास साधण्यासाठी […]

नागपुर :- संपर्क, सातत्य व संवाद हा विकासाचा मूलमंत्र आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उर्वरित प्रदेश यांच्यातील संपर्क, सातत्य, संवाद अधिक बळकट व गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनाबद्ध पावले उचलली आहेत. ‘समृद्धी महामार्ग’ हा त्याचाच एक भाग. समृद्धी महामार्ग हा विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी, सामान्य जनता, नव उद्यमी, लहान उद्योजक, व्यापाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षांना पूर्ततेकडे नेणारा राजमार्ग आहे. हा प्रकल्प आता लवकरच […]

नागपूर :- महानगरपालिका नागपूर, एचडीएफसी बॅक आणि अर्पण ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. ९) रोजी नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त  राम जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांचे सहकार्य […]

नागपूर :-आदिवासी नसतांनाही आदिवासी असल्याचे खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर कार्यरत व नंतर मात्र जातप्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी व कर्मचान्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा निर्णय २९ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले असून या निर्णयाविरुद्ध आदिवासी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक न्यायनिर्णयाला […]

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.9) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक […]

चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध… मुंबई  :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर भाजपचे लोक आता जाणूनबुजून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत केला आहे. दरम्यान भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. महात्मा […]

नागपूर :-भक्तांना सांगण्याचे तात्पर्य म्हणजे नागपूर शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होत असल्या कारणास्तव सर्व प्रकारे सकाळच्या वेळी मार्ग बंद राहतील. व रविवार दि. 11 डिसेंबरलाच संकटी चतुर्थी असल्याने मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. त्यामुळे रेल्वे स्टेशन येथे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होत आहे. म्हणून त्या सुमारास सकाळी ९ च्या दरम्यान कडेकोट बंदोबस्त असल्याने मार्ग बंद राहते. त्या […]

नागपूर :-महान क्रांतिकारक भाई परमानंद यांच्या स्मृतीदिनी, 8 डिसेंबर 2022 रोजी महाल येथील हिंदू महासभेच्या कार्यालयात हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी भाई परमानंद यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करून अभिवादन केले. याप्रसंगी अरूण जोशी म्हणाले, भाई परमानंद एक बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. आर्यसमाज व वैदिक धर्माचे कट्टर प्रचारक होते तसेच […]

नागपूर/मुम्बई : व्हियतनाम येथील ग्लोबल बुद्धिझम टुडे सोसायटीद्वारे बुद्ध धम्माचा प्रचार -प्रसार करने, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीना अंतरराष्ट्रीय ग्लोबल बुद्धिस्ट अम्बेसेडर अवॉर्ड व्हियतनाम देशातील या संस्थेद्वारा दरवर्षी देण्यात येतो. यंदा निवड गगन मलिक फाउंडेशनचे समन्वयक तसेच सामाजिक कार्यकर्ता नितीन गजभिये यांना मुबई येथील सूर्यवंशी क्षत्रिय चैत्यभूमी दादर (पश्चिम) येथे ‘ग्लोबल बुद्धिस्ट अम्बेसेडर अवॉर्ड- 2022’ पुरस्काराने […]

मुंबई :- मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा ग्रंथोत्सव वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार […]

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा मुंबई, चेंबूर येथे शुभारंभ मुंबई :- महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. याचदृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक […]

नागपूर :- विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवार, दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेतील. तक्रारकर्त्यांनी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तरांच्या सर्व प्रतींचे स्वतंत्र दोन संच तयार करुन सोबत आणावेत. तक्रारकर्त्यांने आपले निवेदन सकाळी 11 ते […]

नागपूर :- महा मेट्रोने बांधलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उर्वरित काम पूर्ण झाल्याने रविवार, ११ डिसेंबरपासून चारही दिशांना मेट्रो गाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. महा मेट्रोच्या ऑरेंज मार्गावरील कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक आणि ऍक्वा मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर या मार्गावरील प्रवाशांसाठी मेट्रो रेल्वे सेवेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी 12 वाजल्यापासून ऑटोमोटिव्ह चौक ते […]

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महोत्सवास उपस्थिती नागपूर :- अनेक कलागुण संपन्न वैदर्भीय आहेत. खासदार सांस्कृतिक महोत्सवातून नवीन पीढीला व्यासपीठ मिळत आहे. या सांस्कृतिक मंचातून विदर्भाचे सांस्कृतिक वैभव वाढेल, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. नागपूर खासदार सांस्कृतिक महोत्सवास आज उपमुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, नागपूर व जिल्ह्यातील विविध […]

महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य; बसपाची आक्रामक भूमिका मुंबई :-राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्याने बहुजनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.पाटील यांनी तात्काळ बहुजनांची माफी मागत नैतिकतेच्या आधारे मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शनिवारी व्यक्त केली. महाराष्ट्र हा केवळ फुले-शाहू-आंबेडकर आणि कर्मवीरांच्या पुरोगामी विचारांमुळे शिक्षित आणि पुढारला आहे.बहुजनांना शिक्षणाचा अधिकार […]

नागपूर :-  मोतीबिंदू ही एक मोठी समस्या असून या नेत्र आजारावर काम करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. केवळ सरकारच्या भरवशावर ही मोहीम पूर्ण होणार नसून यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि खाजगी रुग्णालयाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे बोलताना म्हणाले. माधव नेत्रालय आणि वास्तूशांती पूजन व मंगल प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन आज वासुदेव नगर मेट्रो स्टेशन जवळ करण्यात […]

नागपूर :- महाराष्ट्राची भाग्यरेखा ठरू पाहणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी 11 डिसेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याचा तयारीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एम्सला भेट दिली. यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनी आढावा घेतला.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रधानमंत्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. प्रधानमंत्री […]

नागपूर :-नागपूर महानगर पालिकेतील हंसा स्टारबस चे ड्रायव्हर हे मनपाच्या कोव्हीड सेंटरला कार्यरत असताना 15 सप्टेंबर 20 ला त्यांचा मृत्यू झाला. वेळोवेळी निवेदने विनंती करूनही त्यांना पाच पैसे मिळाले नाही. नागपुरातील अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज योजने अंतर्गत कोव्हीड-2019 नुसार कर्तव्य बजावताना मृत झालेल्या त्या कुटुंबाला 50 लाखाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी आज एका पत्र परिषदेद्वारे बसपाचे नागपूर जिल्हाध्यक्ष […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणची कार्यवाही.  कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग कांद्री येथे फिरत्या गाडीवर खाद्य पदार्थ विक्री करताना दुकानदारास मारहाण करून लुटमार करणा-या टोळी तील मुख्य आरोपी चोरवा उर्फ ईरफान शेख यास स्था निक गुन्हे शाखेच्या पथकाने सिताफितीने पकडुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसाच्या स्वाधिन करण्यात आले. नागपुर ग्रामिण हद्दीत कांद्री कन्हान येथे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com