भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासकांनी येत्या पाच वर्षात विमानतळ क्षेत्रात अंदाजे 98,000 कोटी रु. भांडवली खर्चाचे लक्ष्य ठेवले आहे नवी दिल्‍ली :-विमानतळावरील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि आधुनिकीकरण ही एक निरंतर प्रक्रिया असून भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर विमानतळ विकासक सातत्याने यादृष्टीने कार्य करत असतात. हे कार्य जमिनीची उपलब्धता, व्यावसायिक व्यवहार्यता, सामाजिक-आर्थिक विचार, वाहतूक मागणी/विमानकंपन्यांची अशा विमानतळांवर किंवा विमानतळावरून […]

नवी दिल्‍ली :-इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत अशी माहिती, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज दिली. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, जानेवारी […]

नवी दिल्ली :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे स्मरण केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहत आहे आणि देशासाठी विशेषतः आपल्या राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे मी स्मरण करत आहे.

– तांदुळाचे विविध वाण मुख्य आकर्षण  नागपूर :- जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या एच.एम.टी. जयश्रीराम, चिन्नोर, काळा तांदूळ, पिकेव्ही-तिलक आदी उच्चप्रतीचा तांदूळ ग्राहकांना शेतकऱ्यांमार्फत थेट विक्री करण्यात येत आहे. जिल्हयातील तांदूळ उच्च गुणवत्तेसाठी संपूर्ण देशात प्रसिध्द असून शेतकरी अत्यंत कष्टाने घाम गाळून धान उत्पादन करतो. परंतू तांदूळ विक्रीतून मोठा नफा मात्र व्यापारी कमवितात. शेतक-यांनीच उत्पादीत केलेला तांदूळ थेट ग्राहकांना विकल्यानंतर ग्राहकांनाही […]

गडचिरोली :- सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली ने जिल्हास्तरीय कृषीमहोत्सव गडचिरोली जिल्हा अंतर्गत जनजागृती / माहितीपर स्टॉल लावून जनजागृती केली. गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन जिल्हा कृषी कार्यालय,गडचिरोली च्या वतीने दिनांक 12 ते 16 डिसेंबर दरम्यान कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या प्रांगणात करण्यात आले आहे. कृषी महोत्सव दरम्यान विविध विभाग,बचत गट तथा विविध योजनांचे माहितीपर व खरेदी / विक्री चे […]

नागपूर : भारतीय विज्ञान परिषदेचे (इंडियन सायन्स काँग्रेस) 108 वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली 3 ते 7 जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात होणार आहे. जिल्हाधिकारी व कुलगुरूंच्या मार्गदर्शनात यासंदर्भातील आढावा घेण्यात आला.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला देश-विदेशातून मान्यवर येणार आहेत. या ठिकाणी उपस्थित होणारे विषय, संशोधन, चिंतन देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान जगताला […]

औद्योगिक व शेतीविषयक मालाच्या निर्यातसाठी पुढाकार घेणार नागपूर :-  बुटीबोरी, हिंगणा व वाडी या औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी व घनकचरा वर्षानुवर्षे साठविण्यात आला आहे. सांडपाणी तलावात साचून अशुध्द पाण्यामुळे नागरिकांना त्रास होतो. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वाचे काम करुन तातडीने कार्यवाही करावी व या कामास प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या. जिल्हाउद्योग मित्र समिती, जिल्हा निर्यात प्रचालन […]

नागपूर  : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे सेना-भाजप सरकारने अद्यापही अनेक योजनांवरची स्थगिती उठवली नसल्याने जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला ७० कोटींचा निधी व्यपगत होणार आहे. हा निधी खर्च करण्यासाठी आता अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. नियोजन समितीच्या बैठका नियमित होत नसल्याचा फटका या निधीला बसणार आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळातील सर्वच खर्चा स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर चालू आर्थिक […]

गडचिरोली :- दिनांक १५/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी शुभम कोमरेवार, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली यांनी शेतक-यांना शास्त्रोक्त पध्दतीने शेततलावात मत्स्यपालन व मुल्यवर्धीत पदार्थ विषयावर मार्गदर्शन केले.यावेळेस त्यांनी शेतीसोबतच शेततळ्यात मत्स्यपालन केल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल असे प्रतिपादन केले. रोशन डागा, संचालक, रानवारा पर्यटन केंद्र, हिंगणघाट, जि. वर्धा यांनी कृषि पर्यटन विषयावर मार्गदर्शन केले. ज्ञानेश्वर ताथोड, […]

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत ” स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले असुन सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे विजेत्यांची घोषणा आयुक्त विपीन पालीवाल यांनी केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ” माझ्या शहरासाठी माझे योगदान ” या थीमवर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज कामठी ता प्र 15 :- येत्या 18 डिसेंबर ला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत च्या थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी 90 उमेदवार तसेच 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडीसाठी 620 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर ही निवडणूक 122 मतदान केंद्रावर होणार असून या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे तर निवडणूक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  शासनाची ‘सन 2022’पर्यंत सर्वांसाठी घरे संकल्पना धुळीस -मागील पाच वर्षात फक्त 276 लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ -प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे शहरवासीयांचे घरकुल योजनेचे स्वप्न भंगले कामठी ता प्र 15 :- ‘रोटी कपडा और मकान’या त्रिसूत्री कार्यक्रमातील अत्यंत महत्वाचा समजल्या जाणारा भाग म्हणजे निवारा. तेव्हा बेघर असलेल्या नागरिकांसाठी कामठी नगर परिषद च्या वतीने शासकीय योजनेच्या माध्यमातून इंदिरा आवास […]

नागपूर: ईपीस-95 योजनेअंतर्गत मिळणारी तुटपुंजी पेन्शन वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात मोर्चा काढण्याची घोषणा ईपीएस 95 सेवानिवृत्त कर्मचारी राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक यांनी आज केली. समन्वय समिती, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ यांनी संयुक्तपणे आयोजिलेल्या पेन्शनर मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर अध्यक्षस्थानी […]

बेला : मराठी पत्रकार संघ शाखा बेलाच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने घेण्यात आलेला ‘ मी सरपंच बोलतोय ‘ या सामाजिक कार्यक्रमास मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अंदाजे दोन हजार स्त्री ,पुरुष मतदारांनी कार्यक्रमास हजेरी लावली होती. बसस्थानकासमोरील ग्रामसचिवालयाचे इमारतीसमोर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत 14 डिसेंबरला सायंकाळी सात वाजता सदर कार्यक्रम थाटात व उत्साहात पार पडला. यावेळी मंचावर काँग्रेस गटाचे उमेदवार यशवंत डेकाटे, […]

लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह, हिंगणा रोड, नागपूरच्या हृदयरोग तज्ञांची किमया. अत्यंत दुर्मिळ प्रकरण अत्याधुनिक उपचार पद्धतीने हाताळले.    नागपूर:- नागपूरच्या मातृसेवा संघ येथे एका गोंडस मुलीने जन्म घेतला. जन्मत: नवजात बाळाच्या ऑक्सिजनचे प्रमाण ७०-८०% होते, ही गंभीर बाब होती. बाळाला लगेच ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. तरीसुद्धा ऑक्सिजनचे प्रमाण गरजेपेक्षा कमीच होते. २ दिवस उपचार करूनसुद्धा बाळाची परिस्थिती गंभीरच होती. उपचार करत असलेल्या […]

नागपूर  : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत खुल्या भुखंडांवर जप्ती/वारंट कार्यवाही करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लकडगंज झोन अंतर्गत एकूण १२४ भुखंड व मालमत्ता कर रक्कम रूपये ३६,३६,०९४ रूपये थकीत कर वसुली करिता जप्ती कारवाई करण्यात आली. बुधवार (ता. १४) रोजी करण्यात आलेली कार्यवाही लकडगंज झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात […]

नागपूर :- धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या जयंतीचा कार्यक्रम हिंदू महासभेच्या, टिळक रोड, महाल येथील कार्यालयात दि. 12/12/2022 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अरूण जोशी म्हणाले, “आज देशाला धर्मवीर डॉ. […]

मनपा आयुक्तांशी नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पावर चर्चा नागपूर :- कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे शेवरले (Jean Marc SereCharlet) यांनी बुधवारी (ता.१४) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी त्यांचे तुळशीचे रोपटे आणि मनपाचा मानाचा दुपट्टा देउन स्वागत केले. मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये कौंसिल जनरल ऑफ फ्रान्स इन मुंबई जेन मार्क सेरे […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवारी (14) रोजी शोध पथकाने 136 प्रकरणांची नोंद करून 69000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.14) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली, गांधीबाग, सतरंजीपूरा ,‍लकडगंज आणि मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 66 किलो प्लास्टिक जप्त […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com