– जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी रवी नगर येथील आज सी.पी. अँड बेरार कनिष्ठ महाविद्यालय येथे सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

– पोलीस विभागाने बूथ तपासणीसाठी केली पोलीस हवालदाराची नियुक्ती, पोलीस हवालदार मनोज जयस्वाल यांची मतदान बूथवर प्रेस कार्ड दाखवूनही पत्रकारासोबत अभद्र वागणूक  कोदामेंढी :- येथील एकूण 3829 लोकसंख्येपैकी 3057 मतदार आज दिनांक 20 नोव्हेंबर बुधवार ला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाच्या हक्क बजाविणार आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नेहमीप्रमाणे येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 160, […]

कोदामेंढी :- महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीनिमित्त उद्या 20 नोव्हेंबर बुधवारला सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठी यंदा निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध व्हिडिओ व पोस्ट सोशल मीडियावर वायरल करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उद्या 20 नोव्हेंबर बुधवार ला मतदार व लोकशाही यांच्या शुभविवाह इलेक्शन महोत्सव निमित्त आयोजित पत्रिका व्हायरल करण्यात आली […]

यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा करण्यात आला. यावेळी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने राष्ट्रीय विधी सेवा दिनानिमित्त कायदेविषयक शिबिर व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश-२ ए.ए. लऊळकर होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ विधिज्ञ अमरचंद दर्डा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सचिव के.ए. नहार तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील मंडळी, अमोलकचंद विधी महाविद्यालय व महात्मा जोतीराव व सावित्रीबाई […]

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे… अहमदनगर – १८.२४ टक्के,अकोला – १६.३५ टक्के,अमरावती – १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड – १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे – २०.११ […]

नागपूर :- नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स येथे येत्या 22 ते 23 नोव्हेंबर दरम्यानफार्माकोलॉजी विभाग, नॅशनल असोसिएशन ऑफ फार्माकोलॉजी अँड थेराप्यूटिक्स च्या मार्गदर्शनाखाली, फार्माकोलॉजी(औषधविज्ञाना) मध्ये पदव्युत्तरअभ्यासक्रम शिकवणारे शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यासाठी तिसऱ्या राष्ट्रीय परिषदे आयोजन ‘नेप्टीकॉन 2024 ‘चे आयोजन करण्यात आले आहे .या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना ‘सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवीन सीमा शोधणे’ अशी असल्याची […]

मुंबई :-महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज विधानसभा निवडणूक २०२४ करिता १८५-मलबार हिल विधानसभा मतदार संघाअंतर्गत राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

– विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी राज्यात मोठी घडामोड झाली. कुठे मतदारांना पैसे वाटपाचा स्कॅम उघड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला तर काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. आज पुन्हा काही मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटनांचा आरोप झाला. तर काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाले. कार्यकर्ते भिडले. तर आजही मतदानाच्या […]

–  विनोद तावडेंच प्रकरण दाबण्यासाठी भाजपाने सुप्रिया सुळेंच्या क्रिप्टो करन्सीच प्रकरण समोर आणलं का?. म्हणून हे प्रकरण समोर आणलं असं बोललं जातय. त्यावर विनोद तावडे म्हणाले की, “सुधांशु त्रिवेदी हे ठोस माहिती असल्याशिवाय असे आरोप करणार नाहीत. मी पकडलो गेलो नाही. पैसे मिळालेच नाहीत, त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा विषयच येत नाही.” “माझ्याकडे 5 कोटी होते, असं सुप्रिया सुळे बोलल्या पण […]

मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, […]

नागपूर :- विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी रात्री राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले होते, त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यानंतर त्यांना काल सायंकाळी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान उपचारानंतर त्यांना आता डिस्चचार्ज मिळाला आहे, डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची […]

मुंबई :- भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीकडून विनोद तावडे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. यावरून नाल्यासोपाऱ्यात तुफान राडा झाला. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे फोटो आता समोर आले आहेत.यावरून तब्बल साडेतीन तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद […]

नागपूर :- थोर क्रांतीकारक व आदिवासी समाजसुधारक ‍बिरसा मुंडा व महर्षी सुदर्शन महाराज यांच्या जयंती निमित्त पुर्णकृती तैलचित्राला म.न.पा.तर्फे माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपसंचालक डॉ. गजेंद्र महल्ले, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, जयसिंग कच्छवाह, मोती जनवारे, रवि करोसिया, शशी सारवान आदी उपस्थित होते.

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना त्यांच्या १०७ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांनी राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरवर्षी १९ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय एकात्मता दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. देशाचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची तसेच सर्व धार्मिक, […]

मुंबई :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ९ हजार २९३ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार २६५ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. […]

कामठी :- नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दि. १९/११/२४ रोजी दुपारी १२.०० वा कामठी तालुक्याला भेट देऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. मतदानाला केवळ काही तास शिल्लक असल्याने तालुक्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. कामठी येथील संवेदनशील आणि मिश्र वस्ती भागांमध्ये आरसीपी पथक व […]

– ९ मुलांना बिहारच्या बस्करहुन आणले मजुरीसाठी – सहा मुले अल्पवयीन – आर्थिक फायद्यासाठी भावांची शक्कल नागपूर :- रेल्वेने मानव तस्करी करणार्‍या आरोपीस आरपीएफच्या पथकाने नागपूर रेल्वे स्थानकाहून पकडले. सखोल चौकशी करून आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या तक्रारीवरून आरोपी मानव तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद यादव (२६), संजयकुमार यादव (२७) दोन्ही रा. भोजपुरीया, […]

नागपूर :-  देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी स्व.इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली दिली तसेच उपस्थित अधिकारी/कर्मचाऱ्यांना “राष्ट्रीय एकात्मतेची शपथ” दिली. याप्रसंगी अधिक्षक अभियंता मनोज तालेवार, शिक्षणाधिकारी साधना सयाम, उपअभियंता राजीव गौतम, जनसंपर्क अधिकारी ‍मनिष सोनी, अधिक्षक राजकुमार मेश्राम, अधिक्षक अल्का […]

लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी 2 लाख 21 हजार 60 बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. मतदार नोंदणीत वाढ;राज्यात ९.७ कोटी मतदार […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com