कोराडी :-फिर्यादी मोना विलास हिंगणकर वय ४० वर्ष रा. दत्तमंदीर मागे, गणेशपेठ, नागपूर येथे किरायाने राहतात त्यांचे पती विलास देवचंद हिंगणकर वय ४५ वर्ष रा. सिमेंट विट फॅक्ट्री सुरादेवी, कोराडी, नागपूर यांच्या मध्ये घरगुती वाद झाल्याने ते वेगवेगळे राहतात. विलास देवचंद हिंगणकर हे राहत असलेले ठिकाणी त्यांची सत्यम सिमेंट विटाची फॅक्ट्री असुन त्यांचा भाऊ आरोपी १) चंदन देवचंद हिंगणकर वय […]

– सदर पोलीसांची कामगीरी नागपूर :-दिनांक १५.०९.२०२१ चे १८.०० वा. ते दि. १२.०९.२०२२ चे दरम्यान, पोलीस ठाणे सदर हद्दीत ग्रामीण रजिस्टार ऑफीस जवळील नियोजन भवन, येथुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने ए.सी, कॉम्प्रेसर व ए.सी.चे इतर साहित्य असा एकुण किमती अंदाजे ३,६३,५००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी सौदागर विश्वनाथ बागडे, वय ४७ वर्ष, ग, प्लॉट नं. ३७, सुरक्षा नगर, दत्तवाडी, […]

नरखेड :- अंतर्गत मोहगाव रोड नरखेड येथे दिनांक ११/०१/ २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, ना.या पथक यांना गुप्त माहिती मिळाली की, एक इसम अवैधरित्या मोहगाव रोड नरखेड येथे एक ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH 40-CG-9621 वर देशी दारूची वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने घटनास्थळी जावुन नाकाबंदी करून ज्युपिटर मोटरसायकल क्र. MH 40-CG-9621 ला थांबवून चेक […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या नेतृत्वात दिले निवेदन कामठी :- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना दि.११ जानेवारी २०२४ ला भारतीय भोई विकास मंडळ संलग्नित जिवन रक्षक दल च्या वतीने अध्यक्ष एड.दादासाहेब वलथरे, उपाध्यक्ष मनोहर भोयर यांचा मार्गदर्शनात व जिवन रक्षक दल चे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष दिलीप मेश्राम यांच्या […]

मौदा :- अंतर्गत १५ किमी अंतरावर मौजा गुमथाळा शिवार कामठी जि. नागपुर येथे दिनांक १०/०१/२०२४ चे ०५.०० वा. ते ०५.४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन मौदा पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी […]

पारशिवनी :- दिनांक ०९/११/२०२० ते २२/२४ वा. दरम्यान फिर्यादी नामे सरकारतर्फे पोना/५७९ मनीराम नेवारे पो.स्टे. पारशिवनी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप, क्र. २८५/२० कलम ३०४,२०१ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. दिनांक १२/१०/२०२० चे ०९/०० वा. दरम्यान यातील आरोपी नामे बापुराव गणपत मिसार वय ६९ वर्ष रा. कोंढासावळी याने आपले शेतात कोंबडयाचा कुटाराचे संरक्षणाकरीता जाळीचे कंपाउंड लावुन त्या […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई  नागपूर :- फिर्यादी सागर चंद्रभान बाजनघाटे, वय २५ वर्षे, रा. सिरोंजी ता. सावनेर हा मोटारसायकल क्रमांक एम. एच.-४०/वि. झेड-९२३२ नी सावनेर वरुन खापा मार्गे बडेगांव रोडनी घरी जात असतांना दुपारी ०३/३० वा. सुमारास उमरी फाटयाचे समोर १०० मिटर अंतरावर दोन इसमांनी फिर्यादीस हात दाखवुन थांबवुन नमुद अज्ञात इसमांनी चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचा वन […]

नरखेड :- पोलीस स्टेशन नरखेड अंतर्गत पोलीस चौकी सावरगाव हद्दीतील सावरगाव ते सोनोली रोड वर सोनोली शिवारात एक पिवळया रंगाची दस चक्का गाडी क्रमांक MP-09/HG 0325 मध्ये वाहन चालक याने जनावरे कोंबून नेत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने, पोलीस स्टेशन नरखेड, वाहतूक शाखा ना. ग्रा. आणि पोलीस ठाणे काटोल येथील स्टॉफच्या मदतीने सदर ठिकाणी नाकाबंदी करून सदर वाहन थांबविले असता सदर वाहनाची […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या दुर्गा चौकातील नगर परिषद चाळीच्या दुकान नं 4 मध्ये विनापरवाना अवैधरीत्या गेमिंग मशीन अंतर्गत सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात डिसीपी पाच पथकाला गतरात्री यशप्राप्त झाले असून या धाडीतून तीन आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करीत नगदी 1470 रुपये,11 गेमिंग मशीन किमती 1 लक्ष 10 हजार रुपये […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी   दहा चाकी ५ ट्रक, ३३ ब्रास रेती सह एकुण एक करोड पेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त.   १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.  कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीत नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांनी अवैद्य वाळुची वाहतुक आणि बनावट नंबर प्लेट लावुन शासनाची दिशा भुल करुन फसवणुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन पाच ट्रक, ३३ ब्रॉस रेती सह […]

नागपूर :- दि ०६.०१.२३रोजी २२.३० वा दरम्यान मुखवीरदवारे माहीती मिळाली कि एक पांढ-या रंगाचे दोन टिप्पर मध्ये तुमसर रोडने अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे अश्या मिळालेल्या विश्वसनिय माहीतीवरून एच पी पेट्रोल पंप रामटेक जवळ खाजगी वाहनाने उभे असता तुमसर रोडने दोन टिप्पर एकामागे एक येतांना दिसल्याने दोन्ही टिप्पर थांबवुन सदर दोन्ही टिप्परची पाहणी केली असता १. टिप्पर क एम […]

खापा :- दिनांक ०५/०१/२०२४ रोजी खापा पोलीस स्टेशन हद्दीतील खूबाळा रोडवर एक पिकअप वाहन क्रमांक एम एच ३१/एफ सी ७१७३ मध्ये वाहन चालक हा जनावरे कोंबून नेत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने, पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ सरकारी वाहनाने मिळालेल्या खबरेवरून मौजा खुवाव्य येथील मानकसिंग देवरोड चांभार नाला येथे जावुन सदर वाहनाची पाहणी केली असता गाडीमध्ये जनावरे असलेली गाडी असुन व त्या […]

केळवद :- अंतर्गत मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पोलीस स्टेशन केळवद येथील पोलीस पथक पोलीस स्टेशन केळवद हद्दीत नाकाबंदी करीत असताना मुखबिरद्वारे मिळालेल्या खबरे वरुन एक इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन केळवद पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकावंदी करुन मौजा उमरी गावाचे ब्रिज जवळ नाकाबंदी करुन आगसर […]

मौदा :-पोलीस स्टेशन मौदा अप. क्र. १२२७/२३ कलम ३७९ भा.दं.वि. चे गुन्हयाचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण करीत असता गुप्त माहितगाराकडून खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, कळमना येथे राहणारा नितीश प्रजापती हा मागील काही महिन्यापासुन कळमना वस्तीत राहून आपले साथीदारांसह मिळून तार चोरीचे गुन्हे करीत आहे. अशा खबरेवरून दि. ०५/०१/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण यांच्या आदेशाने तसेच […]

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई  बुट्टीबोरी :-पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांचे आदेशाने व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०१/०१/२०२४ रोजी नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना पोलीस ठाणे बुट्टीबोरी हद्दीतून तेलंगणा कडून नागपूरकडे गाडी क्र. UP 84 F 8205 चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ […]

कन्हान :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर मौजा गाडेघाट रोड सुनिल सलून दूकानाचे समोरील रोडवर दिनांक २७/१२/२०२३ चे १०.४० वा. ते ११.२० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे सैय्यद शाहरूख रेशमा सैय्यद, वय २६ वर्ष, रा. अशोक नगर वार्ड क्र. ०५ कन्हान हा त्याचे मित्रसह घटनास्थळी बसुन बोलत असतांना दोन मोटर सायकलवर प्रत्येकी ०३ असे ६ लोक हातात चाकू आणि दंडे घेवून […]

सावनेर :-फिर्यादी नामे प्रितम केशव पारधी, रा. डब्ल्यू सो एल कॉलनी वाघोडा ता. सावनेर हा दिनांक २७/१२/२०२३ रोजी सायंकाळी १७.०० वा. सुमा. WCL स्टेडियम वाघोडा येथे आपली स्वतःची एक हिरो होण्डा पॅशन एर्नेस मो.सा. :MH 40 C 1085 बाहेर ऊभी करून रनिंग प्रक्टिस करीता मैदानात गेला असता रनिंग प्रक्टिस करून घरी जाण्याकरीता परत आपली मोटार सायकल ठेवलेल्या ठिकाणी आला असता […]

बुट्टीबोरी :-पोलीस स्टेशन बुट्टीबोरी अंतर्गत दिनांक ३०/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुर उपविभागात अवैध धंद्यांवर आळा घालणे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस ठाणे बुटीबोरी हद्दीतील धवडपेठ येथे चारचाकी वाहन संशयितरीत्या येतांना दिसले. सदर वाहन चालकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहनात आरोपी मारुती ओमनी कार क्र. TN-51/E-5135 चा चालक (फरार) हा आपले वाहन न थांबवता […]

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 31:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा-भिलगाव मार्गावरील बन्सल कपनीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना आज दुपारी 1 दरम्यान निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकोय उपजिल्हा रुग्णालयात हलविन्यात आले आहे.सदर मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – दोन तरुण गंभीर जख्मी.  कन्हान :- शहरातील अशोक नगर परिसरात भर दिवसा झगडा सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर असामाजिक तत्वांचा सहा इसमांनी चाकु, काठीने प्राणघातक हल्ला करुन दोन तरुणांना गंभीर जख्मी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळखळ उडाली आहे. पोलीसांकडुन प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२७) ला सकाळी १०.४० वाजता दरम्यान जख्मी युवक सय्यद शाहरुख रेश्मा […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com