नागपूर :- पोलीस ठाणे वाठोडा हद्दीत प्लॉट नं. १४२. साई बाबा नगर, खरबी, नागपूर येथे राहणारे फिर्यादीचे मोठे भाऊ पवन शिवशंकर ईखार वय ४० वर्षे हे आपले राहते घराला कुलूप लावुन परीवारासह गोवा येथे गेले होते, त्यांना शेजारी राहणारे यांनी फोनवरून चोरी झाल्याचे सांगीतले. फिर्यादी यांनी भावाचे घरी जावुन पाहणी केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे भावाचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करून, लोखंडी आलमारीतील लॉकर तोडुन त्यातील रोख ३०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ५,७५,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी मोहन शिवशंकर ईखार वय ३४ वर्ष रा. जिजामाता नगर नं. २, साई मंदीर जवळ, नागपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाठोडा येथे पोउपनि, बगमारे यांनी अज्ञात आरोपीविरुध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.