नागपूर :- पोलीस ठाणे पारडी हद्दीत कापसी बुध्द विहार जवळ, पारडी, नागपुर येथे राहणी फिर्यादी कमलाकर हरीभाऊ गजभिये, वय ३९ वर्षे हे आपले राहते घराला कुलूप लावून परिवारासह कामानिमीत्त बाहेर गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन मरात प्रवेश करून, आलमारीत ठेवलेले रोख ६०,०००/-रू. व सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण ३,४१,५००/- रू. वा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे पारडी येथे मपोउपनि मिरा सावंत यांनी अज्ञात आरोपीविरूष्ट कलम ३००५ (अ), ३३१(३) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.