नागपूर :- पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत श्री गणेश हाईट्स, अरुण ऑटोमोबाईल समोर, रिंग रोड, खामला, नागपूर येथे राहणारे फिर्यादीचे आई-वडील घराला कुलूप लावुन सिंगापूर येथे लहान मुलाकडे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने आई-वडीलाचे घराचे मुख्य दाराचे कड़ी कोंडा व कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील आलमारीतील रोख १,५०,०००/- रू. व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ५,५०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी रूचिर सतिश अग्रवाल वय ४१ वर्ष रा. अष्टलक्ष्मी अपार्टमेंट, न्यू अमर नगर, मानेवाडा, नागपूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बजाजनगर येथे पोउपनि बेलदार यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.