नागपूर :-पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत मौजा बेलतरोडी, खसरा नं. १४०/०१, प.ह.नं. ३८ एकुण आराजी ३.४४ हेक्टर जमीन ही फिर्यादी प्रशांत कोठीराम हाडके, वय ४३ वर्षे, रा. फ्लॅट नं. एच/४०४, संचयनी प्रेस्टीज कॉम्प्लेक्स, स्वावलंबी नगर, प्रतापनगर, नागपुर यांचे आजोबा नामे सुखदेव हाडके यांचे नावे होती. नमुद शेतजमिनीचे ७/१२ वर फेरफार नोंद झालेली असतांना आरोपी क. १) हरिदास बळीराम गायकवाड, वय ६७ वर्षे, रा. गल्ली नं. ८. चंद्रमनीनगर, अजनी नागपूर २) विजय पुरुषोत्तम घोडके, वय ४० वर्षे, प्लॉट नं. २, चंद्रमनीनगर, अजनी, नागपूर ३) रितेश श्रीराम घोडेस्वार, रा. न्यु कैलासनगर यांनी संगणमत करून अंजनाबाई गायकवाड सोवत कट रचुन फिर्यादी व इतर वारसाद यांचे मालकीचे शेतजमिनीचे हिस्यातील जमिनीवर खोटे दस्ताचे आधारे आपला हक्क दाखवुन कब्जा करण्याचा प्रयत्न करून, फिर्यादीचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणूक केली. पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकार व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि. अमोन शिदे यांनी आरोपींविरूध्द कलम ४४७, ४६५, ४२०, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.