फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दखल

नागपूर :– पोलीस ठाणे अजनी हद्दीत चंद्रमणी नगर, प्लॉट नं. ३, बुध्द विहार जवळ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी सचिन रतन सातपूते, वय ४२ वर्ष, यांचे शेजारी राहणारे यांचे मार्फतीने त्यांची ओळख आरोपी नामे चंद्रशेखर गुणवंतराव हिवरे वय ४५ वर्ग, रा. प्लॉट नं. ८०, ब्रम्हा नगर, नरसाळा, नागपूर यांचे सोबत झाली. दिनांक २४.०६. २०२४ चे १७.३० वा. व पुर्वी आरोपीने फिर्यादी यांना विश्वासात घेवुन फिर्यादीचे मुलीची अॅडमीशन माऊंट कार्मेल स्कुल मध्ये करून देतो असे खोटे आमीष दाखवुन फिर्यादी कडुन ३१,०००/- रू व ईतर तिन लोकांकडुन १,९५,०००/- रू. असे एकूण २,२६,०००/- रू. घेवुन कोणाचीही अॅडमीशन न करून देता टाळाटाळ करून फिर्यादी व ईतरांचा अन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून पोलीस ठाणे अजनी येथे मपोउपनि. माळी यांनी आरोपीविरूध्द कलम ४०६, ४२० भा.दं. वी अन्वये दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : गुरूवार, दि. १० ऑक्टोबर २०२४ एकूण निर्णय- १६ (भाग १)

Thu Oct 10 , 2024
सार्वजनिक बांधकाम विभाग  वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार वांद्रे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती ही जागेबाबतची निश्चित करणे, सदस्य संख्या निश्चित करणे तसेच इतर कार्यपद्धती ठरवणे याबाबत निर्णय घेईल. —–०—– सार्वजनिक बांधकाम कात्रज कोंढवा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com