कॅप्टीव्ह प्लान्टची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल – बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे

मुंबई : गडचिरोली येथील सुरजागड येथील गडचिरोली मेटल अँड मिनरल्स कंपनीच्या कॅप्टीव्ह प्लांन्टची प्रत्यक्ष पाहणी संबंधित विधानसभा सदस्य यांच्यासह करण्यात येईल असे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य सुनिल केदार, सुभाष धोटे यांनी कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री दादा भुसे म्हणाले की, सदर कंपनीच्या नावाने वाटप करण्यात आलेल्या कॅप्टीव्ह प्लान्टचा दर्जा बदलण्यात आल्याचे नुकसान झाले असल्याची बाब खरी नाही. मात्र संबंधित विधानसभा सदस्य यांना या प्लान्टबाबत काही शंका असलयास या प्लान्टची संयुक्त पाहणी करण्यात येईल.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com