ग्रामपंचायत निवडणूक लढलेल्या उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करावा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 236 ग्रामपंचायतींची निवडणूक 18 डिसेंबर 2022 रोजी पार पडली. ही निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी ग्रामपंचायत अधिनियम 1956 अन्वये एक महिन्याच्याआत निवडणूक खर्च संबंधीत निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार यांच्याकडे सादर करावा, असे आदेश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी (ग्रामपंचयात निवडणूक) यांनी दिले आहेत .

निवडून आलेल्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची अधिसूचना 23 डिसेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचा आदेश व ग्रामपंचायत अधिनियकम 1959 अन्वये निवडणूक लढणा-या उमेदवारास निवडणूक निकालानंतर एक महिन्याच्या आत निवडणक खर्च सादर करणे आवश्यक आहे. यानुसार जिल्ह्यातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विहित कालावधीमध्ये खर्च सादर न केल्यास सदर उमेदवारास अपात्र करण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बंगाली समाज द्वारा युवाओं के लिए क्रिकेट टूर्नामेंट संपन्न

Thu Jan 12 , 2023
नागपुर :- काली माता क्रिकेट क्लब द्वारा बंगाली समाज के युवाओं के लिए एक दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन मोतीबाग रेलवे स्टेडियम में किया गया। यह प्रतियोगिता का 8 वा साल है। इस टूर्नामेंट में शहर की 8 टीमों ने भाग लिया। इन टीमों के बीच नॉक आउट मैच लिए गए। जिसमे से लक्ष्मी क्लब और इम्मामबाडा क्लब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com