संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ या योजनेअंतर्गत सामाजिक न्याय विभाग व समाज कल्याण नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टि ) पुणे यांच्यावतीने तालुक्यातील भुगाव ग्रामपंचायत मध्ये नुकतेच जत्रा शिबिर घेण्यात आले होते.
या शिबिरामध्ये अनेक स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलवर टेकचंद सावरकर , तहसीलदार अक्षय पोयाम यांनी भेट दिली तसेच स्टॉलवरून वि.जे,एन.टी,बी घरकुल अर्जाचा नमुना वाटप करण्यात आला. याप्रमाणे अनुसूचित जातीच्या व्यक्तींना वैयक्तिक घरकुलासाठी रमाई घरकुल अर्जाचा नमूना वाटप करण्यात आला. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे स्वागत करण्यात आले सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निवासी शाळा, मिनी ट्रॅक्टर , दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना, स्वाधार शिष्यवृत्ती योजना,गटई स्टॉल या योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली शिबिनाच्या यशस्वी ते साठी बार्टिचे महासंचालक सुनील वारे,सत्येंद्रनाथ चव्हाण,समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे ,गटशिक्षणाधिकारी अंशुजा गराडे यांचे मार्गदर्शन लाभले. स्टॉलवर समता दूत सुनिता गेडाम कामठी यांनी यशस्वी पणे जबाबदारी सांभाळली शिबिरामध्ये संपूर्ण व्यवस्थापन मंडळ यांनी काम केले शिबिराचे आयोजन नायब तहसीलदार अमर हांडा यांनी केले होते.