नागपूर : – समाज कल्याण विभागांतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिदय रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्याकरिता नागपूर जिल्ह्यात शेती असणा-या इच्छुक शेतक-यांनी समाज कल्याण विभागास शेती विकण्याकरीता विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
Tue Jan 17 , 2023
नागपूर : गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत अर्जदाराने स्वतःचा प्राधिकृत अधिका-याने दिलेला जातीचा दाखला, चालू वर्षातील प्राधिकृत अधिका-याने दिलेला उत्पन्नाचा दाखला (तहसीलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डची […]