गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने 12- गडचिरोली – चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघा अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाची जगजागृती करणे करीता सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, देसाईगंज मानसी (भा.प्र.से.) यांचे मार्गदर्शनाखाली 67-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज तालुक्यातील देसाईगंज, चोप, कोरेगाव, कुरूड, कोंढाळा शंकरपूर तर, आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव, वैरागड, देऊळगाव, वडधा इत्यादी व कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा, इत्यादी गावात स्वीप कार्यक्रम अंतर्गत युवा नेहरु केंद्राचे विद्यार्थ्यांमार्फत प्रत्येक गावात जावुन मतदारांमध्ये जन जागृती करणेकरीता पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. त्यास नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पथनाट्यामध्ये भयमुक्त, विचारपुर्वक मतदान करण्याचे आवाहन करण्यातआले. सदर उपक्रमाला प्रणाली खोचरे गट विकास अधिकारी, देसाईगंज तथा नोडल अधिकारी SVEEP कार्यक्रम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच, एन. जी. वाते ना.तह. कोरची तथा सहा. नोडल अधिकारी SVEEP यांनी सदर पथनाट्याची व्यवस्था करून उपक्रम योग्य पार पाडले.