नागपूर : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सन 2022-23 वर्षात महाडीबीटी या पोर्टलवरील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वीत करण्यात आलेले आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन भरून घ्यावे तसेच महाविद्यालयाने नोंदणीकृत झालेले अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गाचे अर्ज तपासणी करून समाज कल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता सादर करावे. अनुसुचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्तीपासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व संपर्कासाठी दूरध्वनी क्र. २२२१०४१. ईमेल- sdswo.nagpur@gmail.com किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, श्रध्दानंद पेठ, शासकीय औद्योगिक संस्थेसमोर, नागपूर येथे संपर्क साधावा.