नवी मुंबई :- कोंकण विभागातील इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक उपसंचालक यांच्याकडून एक व्यक्ती व एक संस्था यांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार सन 2023-24 साठी अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक उपसंचालक वंदना कोचुरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत वीरशैव लिंगायत समाजाचा सामजिक, शैक्षाणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाज सेवकांना तसेच सदर समाजकार्यसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी अक्षय तृतीया या दिवशी एक व्यक्ती व एक संस्था यांना “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार” देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
हा पुरस्कार अक्षय तृतीय मुहूर्तावर मे-2024 मध्ये देण्याचा प्रस्तावित आहे. तरी या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याकरिता वीरशैव लिंगायत समाजातील इच्छुक असलेल्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडे रितसर अर्ज मुंबई विभागाच्या मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयाच्या सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण या कार्यालयाकडून मागविण्यात येत आहेत.
तरी सदर अर्ज संबधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण या कार्यालयाकडे उपलब्ध असून इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी संबधित कार्यालयात संपर्क साधावा.