शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाचा मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई :- महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरीत करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव आज मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील सुमारे ४७ हेक्टर क्षेत्र असलेल्या जमिनी शिर्डी, साकुरी, निमगाव, कोऱ्हाळे, शिरसगाव या गावात उपलब्ध असून तसेच त्या विनावापर आहेत. शिर्डी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर व्हावा या स्थानिकांच्या मागणीचा आणि भविष्यातील नियोजनाचा धोरणात्मक विचार करून मंत्री विखे पाटील यांनी सदर प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला होता.या प्रस्तावाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महसूल मंत्री विखे- पाटील यांनी आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे धार्मिकस्थळ व सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या शिर्डी व परिसरात भविष्यकालीन दृष्टीने उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यावर महसूल मंत्री

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मान्सूनपूर्व तयारीने नाला सफाईला आली गती  

Wed May 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने  -पूर्व नियोजनाला आली गती कामठी :-पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पावसळयापूर्वी शहरातील नाले साफ सफाई करून शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने कामठी नगर परिषद ने पूर्व नियोजन करणेहेतू मान्सूनपूर्व कामाला गती दिली आहे. यानुसार मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com