सी-डॉट ने जिंकला संयुक्त राष्ट्रांचा WSIS 2024 “चॅम्पियन” पुरस्कार

– सी-डॉट ने जिनिव्हा येथे आयोजित ‘उत्कर्षासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक शिखर परिषदेत’ केले प्रदर्शित सायबर फ्रॉड्स शोधण्यासाठी आणि रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाय

नवी दिल्‍ली :- सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डॉट) या भारत सरकारच्या प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्राला, संयुक्त राष्ट्राचा WSIS 2024 “मोबाइल–एनेबल्ड डिझास्टर रेझिलिअन्स थ्रू सेल ब्रॉडकास्ट इमर्जन्सी अलर्र्टिंग” या श्रेणीतील प्रकल्पासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

इंटरनॅशनल टेलिकॉम युनियन (ITU) द्वारे स्वित्झर्लंड मधील जिनेव्हा येथे 27 मे ते 31 मे 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड समिट द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS)+20 फोरम 2024, या जागतिक शिखर परिषदेने सी-डॉट च्या सेल ब्रॉडकास्ट आपत्कालीन इशारा मंच प्रकल्पाला मान्यता दिली. डब्ल्यूएसआयएस परिणामांच्या अंमलबजावणीला बळकटी देण्यात उत्कृष्ट योगदानासाठी तसेच सामाजिक प्रभावासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सी-डॉट ची वचनबद्धता अधोरेखित करण्यासाठी ब्रॉडकास्ट आपात्कालीन इशारा मंचाला मान्यता देण्यात आली.

डब्ल्यूएसआयएस च्या सोबतीने जिनिव्हा येथे उत्कर्षासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक शिखर परिषद 29 मे ते 31 मे, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. हे व्यासपीठ आरोग्य, हवामान, लिंग समानता , सर्वसमावेशक समृद्धी, शाश्वत पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी आणि इतर जागतिक विकास प्राधान्यक्रमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचार करणारे संयुक्त राष्ट्रांचे क्रियाभिमुख अग्रगण्य व्यासपीठ आहे.

या कार्यक्रमात सी-डॉट ने ITU – CAP आधारित अत्याधुनिक दूरसंचार उपायांचे प्रदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापनासाठी सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान आणि सायबर फसवणूकीमध्ये वापरलेले सिम शोधण्यासाठी ASTR (टेलिकॉम सिम सब्सक्राइबर व्हेरिफिकेशनसाठी एआय आणि फेशियल रिकग्निशन पॉवर्ड सोल्यूशन) यांचा समावेश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एनजीएमए "छत्रपती शिवाजी महाराज: महान राज्याभिषेकाचा 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव" या प्रदर्शनाचे करणार आयोजन

Thu Jun 6 , 2024
नवी दिल्‍ली :- आपल्या देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव साजरा करण्यासाठी, ‘छत्रपती शिवाजी महाराज: महान राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्धापन दिनाचा उत्सव’ हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. नवी दिल्लीतील जयपूर हाऊस येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) मध्ये गुरूवारी 6 जून 2024 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता या प्रदर्शनाची सुरुवात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com