नागपूर :- येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान जी-20 च्या सिव्हील सोसायटी (सी-20) या एंगेजमेंट ग्रृपची बैठक नागपूर येथे होत आहे. यानिमित्त नागपूर शहरात विविध परिसरात रोषणाई व सजावट करण्यात आली आहे.रोषणाई व सजावट पाहण्यासाठी नागपुरची तरूणाई रस्त्यावर उमळली आहे. नागरिक रात्री कुटुंबियांसह या सजावटीचा आनंद घेत येथील दृष्य मोबाईलमध्ये कैद करत समाजमाध्यमांवर अपलोड करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरातील काही ठिकाणची दृष्ये.