लॉयन्स क्लब तर्फे खैरी बिजेवाडा ग्रा.पं. ला ‘ शितशवपेटी ‘ भेट

– ग्रामपंचायतच्या मागणीला दिला मदतीचा हात

– चंद्रपाल चौकसे यांचा पुढाकार

– विविध राजकिय तथा पदाधिकाऱ्यांची हजेरी

रामटेक :- रामटेक – मनसर मार्गावरील ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा प्रशाषणाने लॉयन्स क्लब ऑफ नागपुर लिजेंट ला शवपेटी ची मागणी केलेली होती. त्यानुसार दि. ४ जुन ला शवपेटी भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायतीच्या मागणीला उचलुन धरणारे तथा लॉयन्स क्लब चे सदस्य असलेले पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह लॉयन्स क्लब चे सदस्य व विविध राजकिय तथा नागरीक उपस्थित होते.

नागरिकांच्या घरी कुणाचा मृत्यु झाल्यास व नातेवाईक यायला उशीर असल्यास तेव्हापर्यंत तो मृतदेह कसा व कुठे ठेवावा असा प्रश्न कायम होता. तेव्हा ही समस्या हेरून ग्रा.पं. खैरी बिजेवाडा च्या सरपंच उर्मिला जगदिश खुडसाव व सदस्यांनी सदर बाब पर्यटक मित्र तथा लॉयन्स क्लब चे सदस्य असलेले चंद्रपाल चौकसे यांचेपुढे ठेवली. चौकसे यांनी सदर बाब उचलुन धरत लॉयन्स क्लब च्या वतीने दिनांक ४ जुन रोज रविवारला सकाळी १० च्या सुमारास खैरी बिजेवाडा ग्रा.पं. सदर शितपेटी भेट म्हणुन दिली. आभार व संचालन राजेश जयस्वाल यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये लॉयन्स क्लब ऑफ नागपुर लिजेंड चे सदस्य व पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांचेसह लॉयन्स क्लब चे श्रवण कुमार , विनायक केवटकर, पल्लवी वंजारी , सुनिल भगत, राजू खंडेलवार, क्षीतीजा कालेकर, हरीष कालेकर, मयुरेश कार्तायन, अंजन विस्वास, आचीभ खेमानी, शितल वंजारी, पं.स. माजी उपसभापती गज्जु यादव, सरपंच उर्मिला खुडसाव, राजेश जयस्वाल, ग्रा.पं. सदस्य सुरेंद्र सांगोडे, अल्का जांभुळकर, नितीन बंडीवार, सचिन यादव, वनीता मेश्राम, बब्बा यादव, अमोल खडोतकर व नागरीक उपस्थीत होते.

शवपेटीची करावी लागत होती शोधाशोध – सरपंच खुडसाव

चंद्रपाल चौकसे यांचेसह लॉयन्स क्लब चे आभार व्यक्त करतांना खैरी बिजेवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच उर्मिला खुडसाव यांनी सांगितले की काही वर्षापुर्वी पोलिस विभागात कार्यरत असलेल्या भावाचा मृत्यु झाल्यावर त्याचे प्रेत ठेवण्यासाठी शवपेटी ची खुप शोधाशोध करावी लागली होती. सरते शेवटी पोलिसांना निमखेडा या गावावरून शवपेटी आणावी लागली होती. मी लॉयन्स क्लब चे आभार व्यक्त असे म्हणत गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील ग्रामस्थांना ही शिवशवपेटी दिल्या जाईल असे सरपंच खुडसाव यांनी सांगितले.

महीन्याभरातच दुसरी मागणी पुर्ण – चौकसे

आपले दोन शब्द व्यक्त करतांना चंद्रपाल चौकसे म्हणाले की ग्रामपंचायत प्रशाषणाने लॉयन्स क्लब कडे केलेल्या दोन मागण्या आम्ही अवघ्या महीनाभरातच पुर्ण केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी येथे बस थांबा बांधण्यात आला व आता शवपेटी देण्यात आलेली आहे. लॉयन्स क्लब हा काम करणारा गृप आहे. मागे क्लब च्या वतीने ६oo अभियंत्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्यात आले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मिळू दे सात जन्माची साथ, वट वृक्ष संगोपण करणे काळची गरज

Tue Jun 6 , 2023
– नवविवाहितामध्ये उत्साहाचे वातावरण. वाडी ( अंबाझरी ):- वट पौर्णिमा म्हणजे महिलांसाठी त्याग भावना जागृत करण्याची एक आनंदमयी पर्वणीच असते.पुराण कथांमध्ये ‘जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा”यासाठी वटवृक्षाची पूजा अर्चना करून साकडे घालतात. सावित्रीने सुद्धा मृत्युदिनाच्या तीन दिवसापूर्वी पासून अन्नपाणी त्यागून पतिव्रत धारण केले,शेवटी सत्यवानाला दीर्घायुष्य मिळाले.याच पुराण कथेचा आधार घेऊन आजतागायत महिला वटपौर्णिमेला वडाची पूजा करून आपल्या सौभाग्याचे आयुष्य वाढावे म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!