जवळपास दीडशे नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य शिबिराचा लाभ..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-भिलगाव येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न 

कामठी ता प्र 11:-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या भिलगाव येथील बुद्धविहार सरूनगर येथे समाजसेवक व ग्रा प सदस्य लतेश्वरी ब्रह्मा काळे यांच्या वतीने नुकतेच आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिराचा जवळपास दीडशे नागरिकानी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. .

या शिबिराला सहकार्य अरियास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हस्पिटल यांच्या वतीने आरोग्य सेवा पुरविली.या आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी तपासणी करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन लतेश्वरी ब्रम्हाजी काळे उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा नागपूर यांनी केले असून शिबिराचे उद्घाटन पुज्यनिय भन्ते बुद्धविहार भिलगाव व लतेश्वरी काळे,वकील भाई सिद्दीकी यांच्या द्वारे करण्यात आले या प्रसंगी मोहन माकडे जिल्हा परिषद सदस्य, ब्रम्हाजी काळे सामाजिक कार्यकर्ते, भाषकर भणारे होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी बाबर भाई, प्रीती गोलाइत, कल्पना मुलमुले, झीनत अन्सारी,मनीषा बोध्द,रानी कुकडे, अर्जिता घोष, अंजली गायकवाड, प्रज्ञा वासनिक,किशोर बागडे, बेंदले, अनुश्री खोब्रागडे, टेम्भुरने, रिंकेश मेश्राम, मनीषा धनविजय, पंचशीला बोदेले, दमयंती गणवीर, पद्मा नावाडे, मंदा मेंढेकर,पंचशीला गणवीर आदींनी मोलाची भूमिका साकारली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com