नागपूर :- महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या संपूर्ण विदर्भातील 53 हजार 478 ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक 120 रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
योजनेत सहभागी होण्याचे आवाहन
‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील 11 महिन्यांचे असे एकूण 12 महिन्यांचे वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज असून जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित वीजबिलांसाठी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
गो ग्रीन योजनेत नागपूरकर आघाडीवर
नागपूर परिमंडलातील 18 हजार 774 ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत आपला सहभाग नोंदविला असून यात नागपूर शहर मंडलातील 12 हजार 872, नागपूर ग्रामीण मंडलातील 2 हजार 928 ग्राहक गो ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. तर वर्धा मंडलामध्ये 2 हजार 974 ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक पर्याय स्विकारला आहे.. त्याखालोखाल अकोला परिमंडलातील 13 हजार 41, अमरावती परिमंडलातील 11 हजार 925, चंद्रपूर परिमंडलातील 5035 तर गोंदिया परिमंडलातील 4 हजार 703 ग्राहकांनी कागदविरहीत असलेल हा पर्याय स्विकारला आहे.
असे होता येईल योजनेत सहभागी
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या 15 अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅ्पद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर मंडलनिहाय गो-गीन पर्याय स्विकारणारे ग्राहक
मंडल/परिमंडल गो-ग्रीन ग्राहक
अकोला मंडल 4,913
बुलढाणा मंडल 5,831
वाशिम मंडल 2,297
अकोला परिमंडल 13,041
अमरावती मंडल 7,092
यवतमाळ मंडल 4,833
अमरावती परिमंडल 11,925
चंद्रपूर मंडल 3,091
गडचिरोली मंडल 1,944
चंद्रपूर परिमंडल 5,035
भंडारा मंडल 2,179
गोंदिया मंडल 2,524
गोंदिया परिमंडल 4,703
नागपूर ग्रामिण मंडल 2,928
नागपूर शहर मंडल 12,872
वर्धा मंडल 2,974
नागपूर परिमंडल 18,774
नागपूर प्रादेशिक कार्यालय 53,478