लोकशाहिचा खून करणार्या नार्वेकर चा फोटो जाळुन जोडे मारो आंदोलन

नागपूर :- लोकशाहीची हत्या करणा-या विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकरच्या फोटो ला जोडे मारून व जाळून नागपूरच्या संतप्त शिवसैनिकांनी रेशिमबाग चौकात आज तिव्र निषेध केला.

रेशिमबाग चौकातील शिवसेना कार्यालयासमोर आज दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, संतप्त शिवसैनिकांनी निंब का पत्ता कडवा है. ५० खोके राहूल नार्वेकर ओके अश्या घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, मिंधे सरकार ला येत्या निवडणुकीत यांची किंमत मोजावी लागेल असा इशारा किशोर कुमेरिया यांनी दिला.

लोकशाहीचा खून करणाऱ्या नार्वेकर याच्या फोटोला जोडे मारून जाळून निकालाचा निषेध करण्यात आला यावेळी पदाधिकारी यांनी फोटो जाळत जोडे मारले…

सामान्य जनता हा लोकशाहिचा खून करणाऱ्या नार्वेकर यांचा निकालाचा निषेध आहे. या लोकशाही विरोधी भूमिकेला आमचा विरोध आहे. जनताच आता यांना धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया शिवसेना गटाचे नेते कीशोर कुमेरिया यांनी यावेळी दिली.

या आंदोलनात राजेश कनोजिया, अंकुश कडू, हरि बानाईत, किशोर ठाकरे, महेंद्र कठाणे, शंकर बेलखोडे, मनोज शाहू , शारदाताई मेश्राम, मंगला राणे, शेखर खरवडे, संदिप रियाल पटेल,पुषोत्तम बन, किशोर राठोड,रोहित गौर,समित कपाटे, बबलु दरोडे,अंकित खापेकर,उमेश निकम,शाम तेलंग,विकास देशमुख,सतिश डाथरे,शब्बीर शेख,किशोर धोटे,बालु भुते,शुभम लखपती,निखील जाजुलवार,रोहन तळवडकर,राजु रुईकर, नरेन्द मरगडे,गजानन चकोले,अमित निर्मळ,श्रीकांत खंदाडे, प्रदिप तुपकर,मदन टेकाडे,मनोज जाधव,रोशन वानखेडे,राजेश बांडाबुचे,अतुल माने,अक्षय ताजने, सुखदेव डोके यांच्यासह अनेक शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘अमृत वाहिनी’ म्हणून विभागातील 13 नद्यांचा सर्वंकष आराखडा तयार करा - विजयलक्ष्मी बिदरी

Fri Jan 12 , 2024
Ø ‘चला जाणूया नदीला’ अभियानाला सुरुवात Ø जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आढावा नागपूर :- ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करुन नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदी स्वच्छतेसाठी लोक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत असून विभागातील 13 नद्यांचा अमृत वाहिनी म्हणून विकास करण्यात येणार आहे. नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विभागीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com