भरत टाऊन येथे 2 लक्ष 2 हजार 100 रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खुशबू लॉन जवळील भरत टाऊन येथील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून बेडरूम मधील आलमारी फोडून सोन्या चांदीचे दागिने व नगदी चलनी रुपये असा एकूण 2 लक्ष 2 हजार 100 रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल रात्री साडे आठ वाजता निदर्शनास आले असून यासंदर्भात फिर्यादी महिला शबाना शौकत अली वय 47 वर्षे रा भारत टाऊन कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी महिला ह्या मुलीला व बहिनीला सोबत घेऊन 7 जून ला दुपारी 4 दरम्यान मुंबई येथील हाजी अली दर्ग्याला जाऊन 10 जून ला रात्री परत आले असता घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात 2 लक्ष 2 हजार 100 रुपयांची घरफोडी केल्याचे निदर्शनास आले त्यावरून पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इस्टोनिया महाराष्ट्राशी सायबर सुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक : मार्जे लूप

Wed Jun 12 , 2024
– महाराष्ट्रातील सांस्कृतिक पथक इस्टोनियाला बोलावणार मुंबई :- पूर्वीच्या सोव्हिएत युनिअन मधून स्वतंत्र झालेला इस्टोनिया हा देश सायबर सुरक्षा, ई – गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो व्यवस्थापन आदी उच्च तंत्रज्ञान जगात अग्रस्थानी असून या क्षेत्रात भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी सहकार्य करण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातील नवनियुक्त राजदूत मार्जे लूप यांनी आज येथे दिली.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com