संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वडोदा गावातील रहिवासी नितीन नाकाडे कुटुंबीय सदस्य हे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त स्वतःच्या घरच्या वरील माळ्यावर सायंकाळी 6 दरम्यान पूजा अर्चना करायला गेले असता अज्ञात चोरट्याने खालच्या माळ्यात कुणी नसल्याचे संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून लोखंडी आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 50 हजार रुपये व एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र किमती 24 हजार 500 रुपये असा एकूण 74 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली असून यासंदर्भात फिर्यादी नितीन नाकाडे यांनी स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध भादवी कलम 380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.