सातगाव (वेणा) येथील गोरगरिबांना न्याय देण्याकरिता युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष, तसेच विदर्भवादी नेते निहाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौकात ठिय्या आंदोलन 22 एप्रिल रोजी
नागपुर :- युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या अध्यक्षतेत पत्रकार परिषदेतून सातगाव ग्रामपंचायत मधील 350 कुटुंबांची जबाबदारी पालकमंत्री नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्वीकारावी व त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून द्यावे. अन्यथा संविधान चौकात बेमुदत सत्याग्रह करणार असल्याचे निहाल पांडे यांनी पत्रकारांना सांगितले. सातगाव ग्रामपंचायत चे 350 कुटुंब उध्वस्त करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि गोरगरिबांना बेघर जर करतील तर आम्ही नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरा बाहेर त्यांच्या विरोधात आंदोलन येत्या 22 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये निहाल पांडे यांनी या गरिबांना न्याय देण्याकरिता परिषद घेतली असता सातगाव येथील नागरिकांना घरी मिळून देण्याकरिता व्हेरायटी चौका चौकात गांधीजींच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून संविधान चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर गरिबांना न्याय मिळाला नाही तर आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करणार असा इशारा यावेळी दिला आहे. पत्रपरिषदेमध्ये उपस्थित निहाल पांडे, सुनील चोखारे, अजय कुळसंगे, शंकर बर्मन, भूषण ढाकूलकर, अमित भोसले, ऋषभ राऊत, वर्षा इखार, रेखा अडमाची, जया कयपा, विद्या नागदेवते, अनिता सेमेली, माधुरी कुशवा, वर्षा शेंडे, हेमा पटले, मीनाक्षी कोवळे, दुर्गा तराळे, सुनीता पाटील, विकास विश्वास आणि आक्रमण युवा संघटनेचे तारेश दुरुगकर उपस्थित होते.