कामठी नगर परिषद कर्मचाऱ्याच्या घरात 61 हजार रुपयांची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी नगर परिषद मध्ये कार्यरत कर्मचारी नामे जमिल अहमद यांच्या रणाळा येथील राहत्या घरातील घरमंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्याने घराच्या शौचालय मधील बिना ग्रील च्या खिडकीतून  घरात प्रवेश करून बेडरूम मधील लोखंडी कपाटात सुरक्षित ठेवलेले नगदी,सोन्या चांदीचे दागिने , किपॅड मोबाईल व खाण्याच्या तेलाचा डबा असा एकूण 61 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज पहाटे साडे चार दरम्यान निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी जमिल अहमद अन्सारी वय 47 वर्षे रा गायत्री नगर रणाळा कामठी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह घटनास्थळ असलेल्या घरातील दार आतून बंद करून गाढ झोपेत झोपले असता अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून फिर्यादीचे आई झोपलेल्या बेडरूम मधील लोखंडी कपाटातील नगदी 35 हजार रुपये ,सोन्या चांदीचे दागिने किमती 24 हजार रुपये, मोटोरोला किपॅड मोबाईल किमती 1000 रुपये व खाण्याचे तेल किमती 1 हजार रुपये असा एकूण 61 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाडी में मनाया गया संविधान दिवस, डॉ. बाबासाहब के प्रतिमे पर किया माल्यार्पण 

Sat Nov 26 , 2022
 वाडी :-  विभिन्न सामाजिक संगठनों व राजनीतिक दलों की ओर से शनिवार को संविधान दिवस उत्साह के साथ मनाया गया। इस अवसर पर वाडी शहर के कंट्रोल वाडी स्थित अंबेडकर स्मारक पर विभिन्न दलों द्वारा डॉ. बाबासाहेब अंबेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया.इसके बाद सामूहिक रूप से संविधान की प्रस्तावना का वाचन किया गया. इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com