येरखेड्यात 29 हजार 700 रुपयाची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या शिव पंचायत मंदिर जवळील येरखेडा येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने,नगदी 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 700 रुपयाची घरफोडी केल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी प्रमोद डोंमकुंडवार वय 55 वर्षे रा शिव पंचायत मंदिर समोर येरखेडा कामठी यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 454,380 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी च्या घरात काल सायंकाळी 7 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने अवैधरित्या घरात प्रवेश करून घरात सुरक्षित ठेवलेले 24 हजार 700 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी 5 हजार रुपये असा एकूण 29 हजार 700 रुपयाची चोरी केली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरातून दोन मोबाईल चोरीला

Thu Jun 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बुद्धनगर परिसरातील गणेश दुपारे यांच्या घरात अज्ञात चोरट्याने अवैधरित्या प्रवेश करून घरात ठेवलेले 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेल्याची घटना गतरात्री 12 दरम्यान घडली असून यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या घटनेत तेलीपुरा येरखेडा येथील सुरेंद्र थुल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com