नया गोदाम येथे 2 लक्ष 9हजार 300 रूपयाची घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नायगोदाम येथील एका कुलूपबंद घरातून अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून 2 लक्ष 9 हजार 300 रुपयांची घरफोडी केल्याची घटना काल रात्री 7 वाजता घडली असून यासंदर्भात फिर्यादी प्रमिला येरगुंटवार वय 28 वर्षे रा नया गोदाम कामठी ने स्थानिक पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 545,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी महिला ह्या आपल्या घराला कुलूप लावून कामाला गेली असता अज्ञात चोरट्याने घराच्या स्वयंपाक खोली च्या दरवाजा तोडून अवैधरित्या घरात प्रवेश करून घरातील लोखंडी आलमारीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2 लक्ष 9 हजार 300 रूपयाची घरफोडी केली.यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आडापूल साईबाबा महोत्सवात हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Tue Oct 31 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- महाराष्ट्र शासन ‘क’ श्रेणी तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिर आडापुल कामठी येथे वार्षिक साई बाबा महोत्सवाच्या पर्वावर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराचे संस्थापक श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांचे हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुरुष व महिलासाठी स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती दोन्हीही काउंटरवर हजारोच्या संख्येने पुरुष महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com