संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– सोन्याच्या दागिने सह नगदी २८ हजार रू. असा एकुण ६८ हजार रूपयाची घरफोडी.
कन्हान :- गहुहिवरा रोडवरिल कांद्री-कन्हान येथिल दोन घराचे व एका बार च्या दाराचे कुलुप तोडुन अनिता चवरे यांचे घरातील आलमारीतुन सोन्याचे दागिने व नगदी पंचविस हजार रुपये व बार च्या कॉऊमटर मधिल नगदी तीन हजार रुपये असे अडुसट हजार आणि गणेश वाटकर परिवारासह शिर्डी ला असल्याने त्याच्या येथिल चोरी ते आल्यावरच माहिती होईल. असे एकाच रात्री दोन घरे व एक बार मध्ये अज्ञात चोराने घरफोडी करून पसार झाले.
अनिता देविदास चवरे वय ४७ वर्ष सेंट्रल बँकेत नौकरी करित असुन गहुहिवरा रोड कांद्री येथिल घरी एकटीच राहत असुन शुक्रवार (दि.२१) जुन ला सकाळी नेहमीप्रमाणे घराला कूलुप लावुन कामावर गेली. कन्हान सेंट्रल बँकेतुन सायंकाळी ५ वाजता आई राधाबाई सोनेकर रा. खैरीच्या घरी गेली. रात्रभर खैरी येथेच मुक्काम केला. शनिवार (दि.२२) जुन ला सकाळी ८ वा. शेजारी बंडु लक्षणे यांनी फोन करून सांगितले कि तुझ्या घराचे दार उघडे आहे. त्या नंतर लगेच घरी ये़ऊन पाहिले तर कंपाउंडच्या गेटचा लॉक व घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसल्याने घरात जावुन पाहिले तर घरातील लोखंडी कपाटाचे दार व आतील लॉकरचे लॉक तोडलेले दिसले. आलमारीतील सामान अस्ताव्यस्त होते. आलमारीत ठेवलेले निळ्या रंगाचे पर्स व त्यात ठेवलेले पैसे व सोन्याचे दागीने १) सोन्याची अंगठी ५.५०० ग्रॅम, २) सोन्याची अंगठी २.५५० ग्रॅम, ३) सोन्याचे गळ्यातले लॉकेट ३.१०० ग्रँम, ४) सोन्याचे कानातले रिंग गोल ताराचे ०.५ ग्रॅमचे दोन असे १ ग्रॅम, ५) सोन्याचे एक लॉकेट १ ग्रॅम, ६) सोन्याचे ३० मनी १ ग्रॅम ४९० मीली ग्रॅम, ७) सोन्याची नथ पुण्यशाई १.५०० ग्रॅम असे एकुण १६.१४० ग्रँम सोन्याचे दागिणे जुने वापरात असलेले ४० हजार रूप याचे व नगदी २५ हजार असे एकुण ६५ हजार रुपया चे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले आहे. आणि कन्हान येथुन गहुहिवराकडे येणा-या रोडवरिल पुनम बार येथे सुध्दा शेटर तोडुन काउंटरच्या ड्रावर मधिल ३ हजार रुपये चोरी गेल्याचे समजले. तसेच याच रोडवर असलेल्या पानतावने कॉलजेजवळ प्लाट क्र. ४७ येथील गणेश वाटकर यांचे बंद घराच्या दाराचे कूलुप तोडुन चोरी झाल्याचे दिसले. गणेश वाटकर यांचे घरातील सर्व सदस्य शिर्डी येथे दर्शनाकरिता गेले असल्याने त्यांच्या घरात काय चोरी गेले हे समजले नाही. कोणीतरी अज्ञात चोराने सोन्याचे दागिणे व नगदी असा एकुण ६८,००० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या फिर्यादी अनिता देविदास चवरे वय ४७ वर्ष रा. गहुहिवरा रोड कांद्री कन्हान यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात हे.कॉ नरेश श्रावणकर हयानी अज्ञात चोरा विरूध्द कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.