नागपूर :- आमचे अर्ध आयुष्य मी या जातीच्या तो या धर्माच्या या मध्येच गेले हि रुढी परंपरा संपुष्टात आता आम्ही आणून हा संकल्प आंबेडकरी, आदिवासी, ओबीसी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ऐक्य मिलन घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा जयश्री मसराम होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा यांच्या छायाचित्रावर भाऊसाहेब खुरसंगे यांनी पुष्पहार अर्पण केला तर संजिवनी कुमरे यांनी दिपप्रज्वलन केले. प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे यांनी आंबेडकरी आदिवासी ओबीसी मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने भरपूर योजना दिल्या आहेत त्यांचा लाभ घ्यावा यासाठी आंबेडकरी विचार मोर्चा आणि आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मैदानात उतरले.कवी. कल्पना टेंभुर्णीकर, आनंद गोरे, तन्हा नागपूरी, रमेश ऊईके, अंकिता तुमडाम, रुबीना खान, सुषमा नागरे, यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार मामासाहेब मेश्राम यांनी केले. कार्यक्रमात प्रविण आवळे, शालिक बांगर, कार्तिक मसराम, निरजला युवनाते तेजस्वीनी खंडाते, नेहा कुलसुंगे, वंदना मडावी, नमिता सोंमकुवर, मालती गंधाने, मिना किरंगा, किशोर मसराम, निकिता चौधरी, प्राजक्ता गेडाम, पल्लवी, सुलेखा सुर्यवंशी, सदाशिव सुरपाम, हे होते. कार्यक्रमाचे आयोजन सुदर्शन वाल्मिकी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष बढेल यांनी केले.