मुंबई उपनगर जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवांतर्गत बौद्ध महोत्सव आणि शबरी महोत्सवाचे उद्यापासून आयोजन – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई :- देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’ अंतर्गत राज्यभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून, ‘मुंबई उपनगर जिल्ह्यात बौद्ध महोत्सव हा २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी आणि शबरी महोत्सव २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी ‘आयोजित करण्यात आले आहे. पालकमंत्री लोढा यांनी आज मंत्रालयात विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. भदंत राहुल बोधी, सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे, नितीन मोरे, अरविंद निकाळजे देखील यावेळी उपस्थित होते.

सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बुद्ध महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. भदंत राहुल बोधी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम भिक्खू संघ युनायटेड बुद्धिस्ट मिशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.

मंत्री लोढा म्हणाले, “आपल्या भूमीला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अमोघ वारसा आहे. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या संस्कृतीची देणगी आहे. प्रगतीच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे असेल, तर आपला वारसा आणि संस्कृती जपणं अतिशय महत्वाचं ठरतं. त्याच अनुषंगाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन केले आहे. बौद्ध बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी नेहमीच आपल्या योगदानाने समाजाच्या प्रगतीसाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्याची ही संधी असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.”

शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, डॉ. भदंत राहुल बोधी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. त्यानंतर भीम गीते स्पर्धा, परिसंवाद, संविधान रॅली, धम्मपद भीम गीते यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, या दिवशी सामाजिक संस्था परिचय, कला अविष्कार, महिला मेळावा, धम्म सन्मान आणि शाहीर जलसा असे कार्यक्रम होतील.

त्याचप्रमाणे २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी गोरेगाव (पू.) येथील आरे कॉलनीमधील आदर्श नगर येथे शबरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे विविध पैलू उलगडले जातील. त्यासाठी प्रदर्शने, वैदू संमेलन, जनजागृतीपर नृत्यांचे सादरीकरण, जनजाती पूजा मांडणी, महिला संमेलन यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा कार्यक्रम वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट

Fri Feb 23 , 2024
मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पुणे – नाशिक या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गेल्या अनेक वर्षांची पुणे व नाशिक शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे. तसेच यामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला चालना मिळणार आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com