संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
नागपुर :- बोधिमग्गो महाविहार (भदन्त बोधिवविनीत महाथेरो स्मृति परिसर), इसासनी-भीमनगर, हिंगना रोड, नागपूर येथे गुरुवार, दिनांक 23 मे 2024 ला “बुद्ध जयंती – वैशाख पौर्णिमा” पवित्र दिनी उपोसथ, धम्मदेसना तसेच अनेक प्रकार च्या स्पर्धा, धम्म रैली, संघदान, भोजनदान कार्यक्रमाला शुरूवात झालेली आहे.
कार्यक्रमा चे उद्घाटन प्रसंगी पुज्य भदन्त नागदिपंकर महाथेरो, डाॅ. भदंत सीलवंस महास्थविर, भदंत महानाम, भदंत सुजाततिस्स, अरविंद ढोणे (सरपंच – इसासनी-भीमनगर ग्रामपंचायत) आदि मान्यवरांच्या उपस्थितित पार पडले.
लता मंगेशकर हास्पिटल व रक्त पेढी तसेच रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगना रोड, नागपूर द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरा करीता बोधिमग्गो सेवा संस्था, ग्रामपंचायत, इसासनी-भीमनगर आणि परिसरातील रक्तदाते यांच्या सहभागातुन भदंत सीलवंस थेरो, भदंत महानाम, आयुष्मान स्वप्निल गजभिये, टिनु बोंदाडे, पवण हाडके, चेतन हाडके, रितेश वानखेडे, विलास तंतरपाळे, विनोद बाराहाते, संदेश गजभिये, अंशुल कांबळे, आशिष वानखेड़े, मनोज मेश्राम, दिनेश कळसकर, रवि इंगोले (शिक्षक), निखिल झोडापे आदिनी रक्तदान केले व अनेक उपासक उपासिकांनी दंत तपासणी केली.
या कार्यक्रमाला यशस्वीतेने संपन्न करण्याकरिता बोधिमग्गो संडे स्कूल टीम, बोधिमग्गो वेलनेस सेंटर, भदन्त नाग दिपंकर, भदन्त सुजाततिस्स, अरविंद ढोणे (सरपंच-इसासनी ग्रामपंचायत), शंकरराव निकोसे, एन. टी. मेश्राम, सहादेव बांगर, दुर्वास साखरे, मनोहर येनोरकर, ज्ञानेश्वर मुंजनकर, अमित गणविर, कमलेश मेश्राम व प्रणय साखरे आदिंचे सहकार्य लाभले आहे.