नागपूर :- शासक बनो अभियानांतर्गत बहुजन समाज पार्टीने मुंबईत 9 नोव्हेंबर ला राज्यस्तरीय संमेलनाचे भव्य आयोजन केलेले आहे. या संमेलनाला प्रामुख्याने बसपाचे राष्ट्रीय समन्वयक युवा नेते आकाश आनंदजी प्रामुख्याने मार्गदर्शन करतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय समन्वयक डॉ. अशोक सिद्धार्थ व नितीन सिंग उपस्थित राहतील.
हा कार्यक्रम 9 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता मुंबईत सर्वात मोठे सभागृह असलेल्या माटुंगा (मुंबई) येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ऑड.. संदीप ताजने, प्रदेश समन्वयक ऑड. सुनील डोंगरे, प्रा प्रशांत इंगळे, मनीष कावळे, डॉ. हुलगेश चलवादी यांच्या सोबतच प्रदेश महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हा अध्यक्ष, विधानसभा कार्यकारणी व आजी-माजी पदाधिकारी कार्यरत आहेत.
या कार्यक्रमाचे पोस्टर लोकार्पण धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. अशोक सिद्धार्थ व नितीन सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आता राज्यभर भिंती रंगविण्याचे, पोस्टर चिटकवण्याचे तसेच संमेलन यशस्वी करण्यासाठी सभा, संमेलन व मीटिंग घेण्याचे कार्य प्रदेश पासून तर विधानसभा स्तरापर्यंत सुरू आहे.
मान्यवर कांशीराम साहेबांनी महाराष्ट्रात होऊ शकत है याची लहर सुरू केली होती, ती बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार आकाश आनंद ह्यांच्या नेतृत्वातील कार्यक्रमाच्या यशस्वीतेवर भर देण्यात आलेला आहे. या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीते नंतर महाराष्ट्रात बसपा शासक बनण्याच्या क्षमतेत असल्याचे निदर्शनास येईल असे मत बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.