राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीना विशेष सोहळ्यातून देणार शुभेच्छा
मुंबई :-बहुजन चळवळीच्या सर्वमान्य नेत्या, बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री बहन कुमारी मायावती यांचा जन्मदिनानिमित्त राज्यात येत्या १५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.प्रत्येक गाव, तालुका, जिल्हा, शहरातील कॅडर बहनजींचा जन्मदिवस ‘जनकल्याणकारी दिवस’ म्हणून साजरा करतील,अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी गुरूवारी (ता.१२) दिली. बहेनजींच्या वाढदिवसानिमित्त नाशिक शहरात पक्षाच्या वतीने १५ जानेवारीला ‘संविधान बचाओ महारॅली’ आयोजित करण्यात आली आहे.
रॅलीत राज्यभरातून प्रमुख पदाधिकारी,कॅडर उपस्थित राहतील.पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक, युवा नेतृत्व आकाश आनंद यांच्या मार्गदर्शनात नाशिक येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात संध्याकाळी ५ वाजतापासून आयोजित या समारंभात पक्षाचे केंद्रीय समन्वयक,माजी खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ, केंद्रीय समन्वय नितीन सिंग तसेच राज्य कार्यकारिणीतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मुख्य सोहळा पार पडेल, असे अँड.ताजने म्हणाले.
पक्ष संघटना विस्तार तसेच आगामी निवडणुकीत बहुजनांच्या संख्येच्या आधारावर विविध सभागृहात बहुजन नेतृत्व पोहवण्याचा संकल्प तसेच संविधानावर होणाऱ्या विविध अनावश्यक संशोधनात्मक हल्ल्यापासून रक्षण करण्याचा निर्धार या महारॅलीतून केला जाईल, असे अँड.ताजने म्हणाले. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे यांच्या संगीत प्रबोधनाच्या कार्यक्रमातून पक्षाचे विचार सर्वसामान्य पोहचवण्यात येईल. कार्यक्रमात राज्य समन्वयक प्रा.प्रशांत इंगळे, अँड.सुनिल डोंगरे, डॉ.हुलगेश चलवादी, मनीष कावळे, राज्य संयोजक अभिषेक कुंतल तसेच प्रदेश महासचिव इंजि.शांताराम तायडे प्रामुख्याने उपस्थित राहतील.