नागपूर :- प्रियदर्शि चक्रवर्ती सम्राट अशोक मौर्य यांची 5 एप्रिल (अशोकाष्टमी) रोजी 2329 वी जयंती आहे. कही हम भूल ना जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानांतर्गत सकाळी 10 वाजता दीक्षाभूमी येथे असलेल्या सम्राट अशोक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येईल.
सम्राट अशोक हे तथागत बुद्धाच्या विचाराने प्रेरित झालेले प्रथम महान सम्राट होय. त्यांनी तथागतांच्या स्मृती प्रित्यर्थ देशभर 84 हजार विहार व स्तुपांची निर्मिती केली होती. मानवतावादी, करुणामयी राजाने पशुपक्षासाठी सुद्धा पाण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचा उल्लेख जुनागड, शाहबाजगढी आदि ठिकाणा वरील शिलालेखाद्वारे आजही मिळतो. त्यांचे युग सुवर्णयुग म्हणून ओळखले जाते. त्यांच्या काल कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी बहुजन समाज पार्टीने त्यांच्या जयंती समारोहाचे आयोजन केले आहे.
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम यांच्या चळवळीत कार्य करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी आपल्या प्रियदर्शी सम्राट अशोका ला अभिवादन करण्यासाठी शनिवार 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता दीक्षाभूमी परिसरात एकत्र यावे. असे आवाहन बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.