महाराणा प्रतापसिंह यांची जयंती नवी दिल्ली येथे साजरी

नवी दिल्ली :- महाराणा प्रतापसिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील आयोजित कार्यक्रमात प्रभारी निवासी आयुक्त श्रीमती निवा जैन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात प्रभारी उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

NewsToday24x7

Next Post

कामठी शहरातील झोपडपट्ट्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

Mon May 22 , 2023
कामठी :- कामठी शहर म्हणजे सर्वधर्मीय नागरिकांची एक मोठी वस्ती. या शहराला सन 1990-92मध्ये जातीय दंगलीचे कलंकही लागले आहे आणि तेव्हपासून पोलिस खात्याच्या रेकार्ड मध्ये कामठी शहर हे एक अतिसंवेदनशील शहर म्हणून नोंद झाली आहे.कामठी शहरात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धार्मिय नागरिक समप्रमाणात वास्तव्यास असून इतर जाती जमातीचेही नागरिक येथे वास्तव्यास आहेत. शहरात एकीकडे मिलिटरी छावणी तर दुसरिकडे ड्रॅगन पॅलेस […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com