नागपूर :- नागपूर महानगराचे संस्थापक गोंडराजे बक्त बुलंदशहा उईके यांचा आज 30 जुलै हा जन्मदिवस. बहुजन समाज पार्टीने कही हम भूल न जाये या अभियानांतर्गत त्यांना माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, आदिवासी समाजाचे नेते ऍड वीरेश वरखडे, देवेंद्र ताराम, भीमराव मडावी, ज्ञानेश्वर कुमरे, अनिल कुळमेथे, मनोज गजभिये, जनार्दन मेंढे, अरविंद तायडे आदि प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.