अंबाझरी गार्डन विस्तारीकरणावर बसपाने आक्षेप नोंदवला, डॉ आंबेडकर सभागृहासाठी 20 एकर जागेची मागणी 

नागपूर :- महाराष्ट्र शासनाने अंबाझरी गार्डन विस्तारीकरणाच्या संदर्भात 24 ऑगस्टला अध्यादेश काढून आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. त्यावर बहुजन समाज पार्टीने 26 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदवून अंबाझरी गार्डन परिसरातील 20 एकर जागा डॉक्टर आंबेडकर सांस्कृतिक भवनासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.

बसपा ने 20 एकड जागा आरक्षित ठेवणे, सांस्कृतिक भवन तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे, आंबेडकर सांस्कृतिक भवन विकसित करताना लायब्ररी, वस्तुसंग्रहालय, कॅन्टींग, एडिटोरियम, वाहन पार्किंग, गार्डन आदिंची आंबेडकर भवनाच्या विकास आराखड्यात निश्चित करणे. गरुडा अम्युजमेंट पार्कला केलेले जागेचे बेकायदेशीर हस्तांतरण व तो करार रद्द करणे, बाबासाहेबांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या त्या आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे पुनर्निर्माण करून त्याला संरक्षित करणे. आदीबाबत आजच्या सुनावणीत चर्चा झाली.

बसपाच्या वतीने मनपाच्या नागरिक जीवन स्मरणिकेचे छापण्यात आलेले बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची माहिती देणारे पत्रक, मनपाच्या वाटर वर्क्स (जलप्रदाय विभागाने) 21 जुलै 1988 रोजी काढलेल्या व मंजूर लेआऊट प्लॅन व अभियंत्याचे मंजूर पत्रक ज्यामध्ये 20 एकरात आंबेडकर भवन असल्याचा उल्लेख आहे. आदी कागदपत्रे व लेखी अर्ज नागपूर विभागाच्या नगर रचना सहसंचालक सुप्रिया थुल यांना देण्यात आली.

बसपाच्या वतीने प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, युवा कार्यकर्ते सदानंद जामगडे यांनी आपली उपस्थिती दर्ज केली. यावेळी प्रामुख्याने बसपाच्या प्रदेश सचिव रंजना ढोरे, प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, प्रवीण पाटील, प्रकाश फुले, भानुदास ढोरे, बबीता डोंगरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CRPF कॅम्प येथील गट केंद्रातील 193 उमेदवारांना वैयक्तिकरित्या नियुक्तीपत्रे रोजगार मेळाव्याचे आयोजन CRPF कॅम्प येथील संपन्न

Thu Nov 24 , 2022
नागपूर :- मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी ग्रुप सेंटर, CRPF नागपूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये भारत सरकारच्या CISF, BSF, SSB, आसाम रायफल, NCC रेल्वे, भारतीय खाण ब्युरो, इन्कमटॅक्स, भौगोलिक सर्वेक्षण, एम्स, कॅनरा बँक, युको बँक, बॅक ऑफ बडोदा, ईएसआईसी, पोस्ट मध्ये निवडल्या गेले. यांसारख्या विविध कार्यालयांमध्ये एकूण 193 उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी सर्वचपोस्टने भाग घेतला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com