नागपुरात महापौर बनविण्याचा निर्धार
काँग्रेस ही RSS – BJP ची माय आहे-बसपा !
नागपूर – बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिन निमित्ताने आज सकाळी बसपा चे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ धर्मवीरसिंग अशोक, दुसरे प्रभारी प्रमोदजी रैना, प्रदेश अध्यक्ष ऍड संदीपजी ताजने आदी नेत्यांच्या उपस्थितीत संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर नागपूर जिल्हा बसपाच्या वतीने दत्तवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात बसपाचे प्रदेश प्रभारी व प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनात अभिवादन सभेचा कार्यक्रम झाला.
यावेळी प्रदेश प्रभारी डॉ धर्मवीरसिंग अशोक, दुसरे प्रभारी प्रमोद जी रहे ना प्रदेश अध्यक्ष एडवोकेट संदीप जी ताजणे प्रदेश महासचिव सुनील जी डोंगरे प्रदेश सचिव रंजनाताई ढोरे प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र रामटेके जिल्हा प्रभारी नितीन शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी अभिवादन सभेचे संचालन जिल्हा महासचिव प्रताप सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम यांनी तर समापन शहराध्यक्ष राजीव भांगे यांनी केला.
आमची मुमेंट ही बहुजन समाजाची असून बहुजन समाजात भाईचारा निर्माण करणारी व मानवतेवर आधारित असल्याने आम्ही नक्कीच यशस्वी होऊ त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला मिशनरी चौकटीत व होकारार्थी भूमिकेतून तयार ठेवले पाहिजे तरच आपण नागपुरात बसपाचा महापौर बनवू शकतो असा आशावाद बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रभारी डॉक्टर धर्मवीरसिंग अशोक यांनी व्यक्त केला.
मानवी समाजाला दुःख मुक्तीचा मार्ग तथागत बुद्धांनी दिला, त्यामुळे बहुजन समाज तथागताच्या दुःख मुक्तीच्या मार्गावर चालल्यास नक्कीच शासक बनेल असा विश्वास प्रदेश प्रभारी प्रमोदजी रैना यांनी व्यक्त केला.
बहुजन समाजासाठी काँग्रेस व भाजपा या दोन्ही दुश्मन असल्याने बहुजन समाजाने यापासून समान अंतर राखून बसपाला साथ द्यावी, बसपा बहुजन समाजाला याच विश्वासाने शासक बनवेल. फुले शाहू आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी काँग्रेस भाजपाच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. असे केल्यास आपण नागपूरचा महापौरच काय तर राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा बनवू शकतो. असा आत्मविश्वास महाराष्ट्र प्रदेश चे अध्यक्ष ऍड संदीपजी ताजणे यांनी व्यक्त केला.
काँग्रेस, आरएसएस व भाजपाची माय आहे- ऍड ताजने
बसपा संस्थापक मान्यवर कांशीरामजी साहेब यांनी दिलेल्या दिशा निर्देशानुसार भाजपा काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक नागनाथ तर दुसरा सापनाथ आहे. काँग्रेस हीच मुळात आर एस एस व भाजपाची माय असल्याने त्यांच्यात कुठलेच अंतर नाही, त्यामुळे बसपाने या दोन्ही पक्षापासून समान अंतर ठेवून तटस्थतेची भूमिका स्वीकारली. येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कुणालाही मतदान न करता मतदानावर बहिष्कार टाकला. कारण भाजपा-काँग्रेस हे दोघेही गांधी-गोळवलकरवादी विचारधारेचे असल्याने व आम्ही फुले शाहू आंबेडकरी विचारांचे असल्याने यांच्यात कुठलाच ताळमेळ बसू शकत नाही. आमची विचारधारा स्वतंत्ररित्या शासक बनण्याची असल्याचे यावेळी बसपा चे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट संदीप ताजणे ह्यांनी रविभवन येथे इलेक्ट्रॉनिक मिडिया ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
याप्रसंगी बसपाचे मनपा पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार, ज्येष्ठ नेते उत्तम शेवडे, राजकुमार बोरकर, नागोराव जयकर, अभिलेश वाहने, चंद्रशेखर कांबळे, सतीश शेळके, विलास मून, महेश शहारे, विलास सोमकुवर, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, सुरेंद्र डोंगरे, भानुदास ढोरे, शशिकांत मेश्राम, वर्षाताई वाघमारे, सुरेखा डोंगरे, वंदना कडबे, सचिन कुंभारे, बुद्धम् राऊत, नितीन वंजारी, सुनील कोचे, सागर लोखंडे, तारा गौरखेडे, सुनंदा नितनवरे, बलवंत राऊत, उमेश मेश्राम, गौतम पाटील, राजरत्न कांबळे, मुकेश मेश्राम, धर्मपाल गोंगले, प्रवीण पाटील, सागर वराडे, राकेश गजभिये, विकास नागभिडे, इब्राहिम टेलर, वैशालीताई नारनवरे, वंदनाताई चांदेकर, नरेंद्र मेंढे, अस्मिता प्रणय मेश्राम, दीपक जांभुळकर, सुरेश मानवटकर, सुधाकर सोनपीपळे, प्रकाश गजभिये आदी प्रमुख बसपा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक आप आपल्या विधानसभेतून झेंडे व कार्यकर्ते घेऊन दत्तवाडी येथील अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाले होते.