संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी शहर प्रभारीपदी राजन मेश्राम यांची नियुक्ती
कामठी :- आजच्या राजकीय स्पर्धेत पक्ष संघटन मजबुती व बळकटीसाठी बहुजन समाज पार्टीने कंबर कसली असून नुकतेच कामठी शहरात संपन्न झालेल्या बहुजन समाज पार्टी कामठी मौदा विधानसभाच्या बैठकीत बसपाचे राष्ट्रीय महासचिव तसेच प्रदेश प्रभारी भीम राजभर, सुनील डोंगरे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप ताजने यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र राज्य महासचिव तसेच नागपुर जिल्हा इंचार्ज नागोराव जयकर,प्रदेश सचिव व कामठी मौदा विधानसभा इंचार्ज नितीन सिंगाडे व विजयकुमार दहाट यांनी कामठी विधानसभा कार्यकारिणी जाहीर केली.जाहीर कार्यकारीणीनुसार कामठी-मौदा विधानसभा प्रभारीपदी मनोज रंगारी तसेच कामठी शहर प्रभारी पदी राजन मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.
तसेच जाहीर कार्यकारीनी नुसार कामठी मौदा विधानसभा अध्यक्षपदी चंद्रगुप्त रंगारी,कामठी मौदा विधानसभा उपाध्यक्षपदी अनिल कुरील ,महासचिव पदी अशोक गजभिये तसेच कामठी मौदा विधानसभा महिला आघाडी अध्यक्षपदी कामठी नगर परिषद च्या माजी सभापती रमा गजभिये यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तसेच कामठी शहर अध्यक्षपदी विनय उके यांच्या निवडीसह कामठी शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.