नागपूर :- कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथील विद्यार्थी आर्यन नहाते ह्याने अमृतसर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरचे प्रतिनिधीत्य करीत उत्कृष्ट कामगिरी बजावून तृतीय क्रमांक प्राप्त करून कास्यपदक पटकावले. त्याच्या या कमगिरीमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर तसेच कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूरचे नांव उंचावले आहे.
आर्यन नहातेच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ जिम्नॅस्टिक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीकरिता अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय डॉ. सुहासिनी वंजारी, संस्थेचे सचिव तथा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. अभिजीत वंजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपुरच्या सिनेट सदस्या तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. सी, स्मिता वंजारी यांनी आर्यनला पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे हार्दीक अभिनंदन केले आणि त्याला भविष्यातील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक, शारीरिक शिक्षक डॉ. चेतन महाडिक व अभिषेक लांबट यांनी सुध्दा आर्यन नहातेचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्याला उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.