समाज परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज – प्राचार्या डॉ. ईशा मुदलियार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– स्वामी अवधेशानंद शाळेत जागतिक महिला दिन साजरा

कामठी :- श्री सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था द्वारे संचालित स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कामठी येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या डॉ ईशा मुदलियार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, समाज परिवर्तन घडवून आणणे ही काळाची गरज झाली.

समाज परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य फक्त एक महिलाच करू शकते. प्राचार्य डॉ. ईशा मुदलियार आणि उपप्राचार्य अविनाश धोटे सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन रंजना नारनवरे आणि आभार प्रदर्शन आरती लोणारे यांनी केले. कार्यक्रमाला संपूर्ण नारी शक्ती संपा सरकार, प्रीती हिवरेकर, ज्योती आष्टीकर, ज्योती आगरकर यांच्या सह शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात होणार पूर्ण - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Mar 9 , 2024
▪️ पुणे- नगर-छत्रपती संभाजी नगर सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या नागपूर :-  समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र संभाजी नगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com