अमरदिप बडगे, प्रतिनिधी
वाघाची दहशत वाढली; भर दिवसा वाघाचे दर्शन मुंडीपार रस्त्यालगत जंगलात
गोंदिया – जिल्ह्यच्या गोरेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत मुंडीपार रस्त्यालगतच्या जंगलात भर दिवसा वाघांचे दर्शन होत असल्याने या भागातील नागरिक धास्तावले आहेत. वाघाची दहशत वाढली असल्याने नागरीकानीं घराच्या बाहेर निघावे कसे, असा प्रश्न मुंडीपार गावातील नागरीकांपुढे निर्माण झाला आहे. नागझीरा अभयारन्य गोरेगाव तालुक्याला लागुन असल्याने सतत वाघांचे , बिबटचे दर्शन नागरीकांना होत आहेत. तर असीच दहसत जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातही कायम आहे.
काल नागरिकांना भर दीवसा वाघाचे जवळून दर्शन झाले. गोरेगाव वनविभागाअंतर्गत मुंडीपार वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. वनविभागाने मुंडीपार परिसरात फिरणार्या वाघांचा बंदोबस्त करावा, दहशत कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील नागरीकांनी केली आहे.