– दिनेश दमाहे,मुख्य संपादक
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई..
नागपूर – बॅग लिफ्टिंग व जबरी चोरी करणारी आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगारांची कुख्यात टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या नागपूर ग्रामीण पथकाला मोठा यश आले आहे.
प्राप्त माहिती नुसार पोलीस पथक दि.22/10/2022 रोजी पोलीस ठाणे रामटेक येथील अप.क्र्र. 609/22 कलम 379,392,34 भादवि च्या जबरीच्या गुन्हयातील आरोपी शोध संबंधाने नागपुर ग्रामिण हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना रामटेक येथे दाखल गुन्हयात चेक केलेले ब्ब्ज्ट फुटेज मध्ये दिसणारे संशयीत आरोपी हे मोटर सायकलने पोलीस ठाणे कन्हान हद्दीतील तारसा चौक परिसरात फिरत असल्याचे गुप्त माहीती प्राप्त झाली. त्यानुसार स्थागुशाचे पथकाने तारसा चौक येथे जावून शहानिशा केली असता चार इसम हे मोटर सायकल MH 19 DE-3313 आणि MH 28 AH-2799 ने संशयीतरित्या फिरत असतांना आढळून आले. पोलीसांना पाहुन सदरचे संशयीत इसम पळुन जावु लागले. त्यांचा पाठलाग करुन 3 इसमांना पकडण्यात आले. त्यांचेपैकी एक इसम अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. मिळुन आलेले इसम नामे 1) राजेश पवलु गोटेटी, वय 35 वर्ष, 2) राजु प्रभाकर सिंगमसेट्टी, वय 39 वर्ष, 3) अनिल बद्री पेटला, वय 22 वर्ष, तिनही रा. तिप्पा, मंडल-बोगोल, ता. कावली जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश अशी आरोपीतांची नावे असून पळुन जाणारा इसम 4) विक्रम सामील सल्ला वय 30 वर्ष,रा.तिप्पा, मंडल-बोगोल, ता.कावली जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश हा असल्याची माहिती मिळाली. या तिनही आरोपींनी दि. 17/10/2022 रोजी रामटेक येथील स्टेट बॅंक ऑफ इंडीया येथे एका इसमावर पाळत ठेवली व तो इसम बॅंकेतून पैसे विड्रॉल करुन नगदी 2,00,000/- रुपयांची रक्कम एका बॅग मध्ये ठेवुन बाहेर येवुन पुढील कामाकरीता नजीकच्या पोस्ट ऑफीस मध्ये जात असतांना यातील आरोपीतांनी संगणमत करुन त्या इसमाच्या हातातुन पैशाची बॅग जबरीने हिसकावुन नेली. मिळालेल्या तिनही आरोपीतांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी यापुर्वी सन 2021 मध्ये व सन 2022 मध्ये रामटेक, सावनेर, कन्हान, मौदा, भंडारा, तुमसर, जळगाव, पातुर (अकोला), वरूड (अमरावती) तसेच मध्य प्रदेश येथील पांढुर्णा, सौंसर आणि कोतवाली, जि.छिंदवाडा(मध्यप्रदेश) परिसरात मोटर सायकलने चोरी व लुटमारीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. मागील काही महिण्यापासुन चोरी व लुटमार करण्यासाठी आरोपीतांनी बुलढाणा व जळगांव परिसरातील होंडा ट्रिगर व होंडा युनिकॉर्न या 2 मोटार सायकल ची चोरी करुन त्या मोटार सायकलने चोरी व लुटमारीचे गुन्हे केल्याचे सांगीतले. वरील नमुद आरोपीतांकडुन नागपूर ग्रामीण हद्दीतील 6 गुन्हयासह महाराष्ट्रातील व मध्यप्रदेशातील एकुण 15 चोरी व लुटमारीचे गुन्हे उघडकीस आले असुन या सर्व आरोपीतांनी खालील नमुद पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.
1 पोलीस स्टेशन रामटेक, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम 609/22 कलम 379,392,34 भादवि,
2 पोलीस स्टेशन सावनेर, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम804/21 कलम 379 भादवि
3 पोलीस स्टेशन कन्हान, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम159/21 कलम 379 भादवि
4 पोलीस स्टेशन मौदा, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम340/22 कलम 379 भादवि
5 पोलीस स्टेशन सावनेर, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम 806/22 कलम 379 भादवि
6 पोलीस स्टेशन सावनेर, नागपूर ग्रामीण – अप.क्र.व कलम302/22 कलम 379 भादवि
7 पो.स्टे. वरूड जि. अमरावती, – अप.क्र.व कलम767/22 कलम 379 भादवि,
8 पो.स्टे. पातुर जि. अकोला – अप.क्र.व कलम312/22 कलम 420 भादवि,
9 पो.स्टे. भंडारा जि.भंडारा – अप.क्र.व कलम 449/22 कलम 379 भादवि,
10 पो.स्टे. तुमसर जि. भंडारा – अप.क्र.व कलम412/22 कलम 379 भादवि,
11 पो.स्टे. फैजपुर जि. जळगाव – अप.क्र.व कलम179/22 कलम 392 भादवि,
12 पो.स्टे. जळगाव शहर जि.जळगांव – अप.क्र.व कलम310/22 कलम 379,34 भादवि,
13 पो.स्टे. कोतवाली जि.छिंदवाडा (मध्यप्रदेश) – अप.क्र.व कलम473/22 कलम 379 भादवि,
14 पो.स्टे. सौसर जि.छिंदवाडा (मध्यप्रदेश) – अप.क्र.व कलम298/22 कलम 379 भादवि,
15 पो.स्टे. पांढुर्णा जि.छिंदवाडा, (मध्यप्रदेश) – अप.क्र.व कलम402/22 कलम 392 भादवि
वरील नमुद आरेापीतांच्या ताब्यातुन चोरी व लुटमारीच्या गुन्हयातील नगदी 1,06,900/-रू, तिन मोबाईल संच किं. 42,000/- रू. तसेच गुन्हे करते वेळी वापरलेल्या चोरीच्या दोन मोटर सायकली किं. 1,10,000/-रू. असा एकुण किं. 2,58,900/-रू चा माल जप्त करण्यात आला आहे. व पुढील कायदेशीर प्रक्रीयेकरीता पोलीस स्टेशन रामटेक, नागपूर ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आले.
वरील आरोपी हे गुन्हे करतांना विशेषतः बॅंकेमधून मोठया रक्कमा विड्रॉल करणाऱ्या एकटया असणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेवून त्यांना आपले लक्ष बनवित होते. नगदी रक्कम घेवुन बॅंकेच्या बाहेर येताच त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यांना गाफील ठेवत असे व त्यानंतर संधी साधून नागरिकां जवळील पैशांची चोरी करीत होते. अशा वेळी सहजरित्या चोरी करणे शक्य न झाल्यास बॅकेतुन पैसे घेवुन निघणा-या नागरिकांचा बॅंकेपासून काही अंतरापर्यंत पाठलाग करुन त्यांच्याकडील पैसे जबरीने हिसकावुन मोटरसायकलने पळून जायचे. अशा पध्दतीचे गुन्हे करीत असतांना पोलीस मोबाईल कॉल डिटेल्सची माहिती काढून आरोपीतांचा मागोवा घेत असतात याची या आरोपीतांना चांगलीच जाणीव असल्याने सर्व आरोपी हे गुन्हा करतांना मोबाईल फोनव्दारे कॉल न करता मोबाईल फोनच्या माध्यमातुन फेसबुक मॅसेंजरचा उपयोग करुन एकमेकांचे संपर्कात राहत असत.
सदरची कामगिरी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस अधीक्षक, राहुल माकणिकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा.पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेन्द्र चौधरी, दिनेश आधापूरे, राजेंद्र रेवतकर, पोलीस नायक रोहन डाखोरे, विपीन गायधने, अमोल वाघ, शैलेष यादव, सतिष राठोड, चालक पोलीस हवालदार अमोल कुथे यांचे पथकाने केली.