गावात दहशतीचे वातावरण
– बेला, प्रतिनिधी
उमरेड – उमरेड तालुक्यातील बेला गावाजवळ असलेल्या गट ग्रामपंचायत बोरगाव लांबट येथे एका व्यक्तीने कार्यालयात फोन केल्याची घटना 13 तारखेच्या मध्यरात्री घडली. यामुळे गावात दहशतीचे वातावरण असून सरपंचाच्या तक्रारीवरून बेला पोलिसांनी गावातीलच इन्द्रपाल भगवान कंगोल या पस्तीस वर्षाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बोरगाव लांबट येथे राहणारा कंगोल याने काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडकीचे का फोडले. त्यावेळी त्याला समज देऊन सोडण्यात आले. 13 फेब्रुवारी च्या मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या दरम्यान त्यांनी हातात संब्बल आणि कुऱ्हाड घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. तो हे करत असताना त्याच वेळी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचा चपराशी रात्री शौचास जात असताना हा प्रकार दिसून आला. चपराशी त्याच्यावर ओरडला आणी त्या समजाविले. तेव्हा उलट कंगोल याने चपराशाला शिवीगाळ करू लागला व तेथून जाण्यास सांगितले. अन्यथा तुझा मर्डर करून टाकील असे म्हणून त्याने ग्रामपंचायत कार्यालयातील संत गाडगे बाबांचा फोटो, कम्प्युटर, प्रिंटर, टेबल-खुर्च्या यांची तोडफोड केली. एवढेच नाही तर त्याने कार्यालयातील रजिस्टर सुद्धा फाडले. इंद्रपाल ने ग्रामपंचायत सचिवाला सुद्धा जीवाने मारण्याची धमकी दिली. महिला सरपंचाला अत्यंत घाणेरड्या शिव्या दिल्या. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य…. आहे. असं म्हणून तो तेथुन निघुन गेला. कंगोल ने जवळपास 3.50ते 4 लाख रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात दहशतीचे वातावरण असून गावच्या सरपंच सुनीता लक्ष्मण राव लांबट, ग्रामपंचायतीचा चपराशी आणि इतरांनी त्याच्याविरुद्ध बेला पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.